नाशिक

हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

किमान तापमान 8.1 तर कमाल तापमान 29.2

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात बुधवारी (दि. 10) हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. बुधवारी नाशिक शहराचे तापमान 8.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले तर कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. चार दिवसांत तापमान चार अंशांनी घटल्याने शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पहाटे आणि सायंकाळच्यावेळी अधिक गारठा जाणवत आहे. थंडीचा कडाका अचानक वाढल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तापमानातील झपाट्याने घसरण जाणवत असल्याने सर्दी, खोकला, श्वसन त्रास अशा आरोग्य समस्या वाढू लागल्या आहेत. दरम्यान, नाशिक शहरात दरवर्षी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत असते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात तापमान किती अंशांपर्यंत खालावले जाणार, याबाबत नाशिककरांना उत्सुकता आहे. येत्या आठवडाभर थंडीचा जोर कायम असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, थंडी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात सेन-यार आणि दिट-वाह ही दोन चक्रीवादळे तयार झाली होती. त्यानंतरही राज्यात अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र 20 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. उत्तर भारतातील थंड वारे ईशान्येकडून थेट महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. दक्षिणेकडील हंगामी मॉन्सूनचा प्रभाव संपल्यामुळे या थंड वार्‍यांना कोणताही अडथळा राहत नाही. तसेच पश्चिमी क्षोभ सलग येत असल्याने थंड वार्‍यांचा पुरवठा कायम आहे. याचबरोबर जेट स्ट्रीमचा पट्टा 39 अंशांवरून 22 अंश अक्षवृत्तापर्यंत दक्षिणेकडे सरकल्यामुळे गारठा अधिक
जाणवत आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago