नाशिक

स्थायी समितीच्या चाव्या मच्छिंद्र सानप यांच्याकडे

निवडीची औपचारिकता बाकी; मुकेश शहाणेंचाही अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
महापौर, उपमहापौरपदाची निवड झाल्यानंतर सर्वांच्या नजरा महापालिकेच्या अर्थवाहिनीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समिती सभापती निवडीकडे लागल्या होत्या. दरम्यान, स्थायी सभापतिपदावर बुधवारी (दि.25) पडदा पडणार आहे. सोमवारी (दि.23) भाजपचे मच्छिंद्र सानप यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह वरिष्ठांच्या उपस्थितीत अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकेश शहाणे यांनीदेखील सभापतिपदासाठी अर्ज भरला. बुधवारी सभापतींची निवड औपचारिकताच ठरणार आहे.
सोमवारी सायंकाळी भाजप व शिंदेसेनेचे स्थायी समिती सदस्य रामायण बंगल्यापासून सहलीला रवाना झाले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, लक्ष्मण सावजी उपस्थित होते. स्थायी समितीत भाजपचे सर्वाधिक नऊ त्याखालोखाल शिंदेसेनेचे चार, असे एकूण 13 स्थायी समिती सदस्यांचे संखाबळ भाजपकडे आहे. त्यामुळे बुधवारी होणारी स्थायी सभापतिपदाची निवडणूक औपचारिकता राहिली आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान शिंदेसेनेला सत्तेत घेण्यापूर्वी भाजपने उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करण्यात केली होती. पण नंतर भाजपने शिंदेसेनेचे विलास शिंदे यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ टाकत शिंदेसेनेला सोबत घेतले. सानप यांना मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी होती. पक्षाने सानप यांची स्थायी सभापतिपदी वर्णी लावत त्यांची नाराजी दूर केल्याचे दिसत आहे.

भाजप महायुतीने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे 16 सदस्यांपैकी भाजप 9, शिवसेना शिंदे गट चार, राष्ट्रवादी काँग्रेस एक, असे 14 सदस्य महायुतीच्या उमेदवाराकडे आहेत. स्थायी समिती सभापती भाजप महायुतीचाच होईल, हे निश्चित आहे. – सुनील केदार, भाजप, जिल्हाध्यक्ष

महापौरपद भाजप, तर उपमहापौरपद शिंदेसेनेच्या वाट्याला आले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतलाच घटक असल्याने त्यांनी स्थायी समिती सभापतिपदाची संधी आम्हाला देणे अपेक्षित आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण सभापती पदासाठी अर्ज भरला आहे. निवडीच्या दिवशी पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल.
– मुकेश शहाणे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस

न्याय मिळाला

पक्षाने न्याय दिला असून, प्रामाणिकपणाची दखल घेतली आहे. यापुढेही पक्षवाढीसाठी निःस्वार्थपणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने काम करत राहू.
-मच्छिंद्र सानप, उमेदवार, स्थायी समिती सभापती, भाजप

Machhindra Sanap holds the keys to the standing committee

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago