नाशिक

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जि.प. इच्छुकांचा हिरमोड

निवडणुकीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार

नाशिक ः प्रतिनिधी
आरक्षणाच्या मुद्यावरून अंतिम तोडगा निघेपर्यंत निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून देव पाण्यात ठेवलेल्या इच्छुक उमेदवारांचा पुन्हा अपेक्षाभंग झाला आहे.
राज्यातील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणामुळे रखडल्या आहेत. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर अंतिम तोडगा निघेपर्यंत निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आरक्षणाच्या कायदेशीर वैधतेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सद्यःस्थितीत निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने यावरील स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून निवडणुकांची वाट पाहणार्‍या विविध पक्षांना व इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी फेब्रुवारीत जिथे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या आत होती अशा राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. नाशिकसह ज्या भागांत आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक आहे अशा जिल्हा परिषदांत निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आरक्षणासंदर्भातील अंतिम निकाल येईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. नाशिक जिल्ह्यात महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे इच्छुक डोळे लावून बसलेले असतानाच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

supreme-court-decision-creates-panic-among-zp-aspirants

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago