शहरभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह

नाशिक ः प्रतिनिधी
शहरभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह दिसून आला. शहर आणि उपनगरांतील उपनगरांतील गणेश मंदिरांमध्ये गणेश जन्माच्या सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि.22) करण्यात आले होते. यावेळी फळे-फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी शहरातील नवश्या गणपती, अण्णा गणपती, इच्छामणी गणेश मंंदिरासह विविध गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार कारंजा मंदिरामध्ये दुपारी गणेशोत्सव, पाळणा, आरती करण्यात आली. जवळपास 300 महिलांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी मोरपंखांनी आणि फळांनी गणेशाची आरास करण्यात आली होती.
गणपती अथर्वशीर्ष पठण, गणेश याग, अभिषेक, प्रसाद वाटप करण्यात आले. रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाळणा सजविण्यात आला होता. महिलांनी यावेळी गणेशजन्माची गाणी गायली तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करीत गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दुपारी 12 वाजेपासून प्रसादाचे वाटप करण्यात आले. पहाटे सनईवादनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत गणेशमूर्तीस अभ्यंगस्नान, महादुग्धाभिषेक, महाआरती करण्यात आली. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत शांतीसूक्त, पाठ संकल्प गणेश होम करण्यात आला. दुपारी 11 ते 12 या वेळेत गणेशजन्म पाळणा, दुपारी 1 ते सायंकाळी विविध हवन करण्यात आले.दुपारी 3 वाजेपासून महाप्रसाद, सायंकाळी पूर्णाहुती पूजन करण्यात आले. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा होणारा माघी गणेश जन्मोत्सव पुण्यफलदायी मानला जातो. या दिवशी गणेशाचे दर्शन, अभिषेक व उपासना केल्याचे फलदायी मानले जाते.

Maghi Ganesh Jayanti excitement across the city

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *