णमोकार महोत्सवासाठी कामे वेळेत पूर्ण करावीत

जिल्हाधिकारी : आढावा बैठकीत निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
चांदवड तालुक्यातील मालसाने येथे 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या णमोकार तीर्थ महोत्सवाच्या प्रस्तावित कामांना गती देऊन 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, महावितरणचे कार्यकारी अभियंता बिर्‍हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी बाळू पाटील, चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा विभागाच्या श्रीमती वाडिले, सुमेर काला व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, 6 ते 25 फेब्रुवारीपर्यंत होणार्‍या णमोकार तीर्थ महोत्सवासाठी अति महत्त्वाच्या व्यक्तींसह पर्यटक भेट देणार आहेत. यादृष्टीने सर्व विभागांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडावी. पाणीपुरवठा विभागाने महोत्सव काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. पार्किंग व्यवस्था, अंतर्गत रस्ते याबाबतच्या कामांना गती द्यावी. महोत्सवाच्या ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना 24 जानेवारीपर्यंत कार्यालयीन आदेश निर्गमित करावेत. प्रस्तावित कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव 24 जानेवारीपर्यंत तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.

Work should be completed on time for the Namokar Festival

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *