नाशिक : प्रतिनिधी
महादरवाजमेट पाडा परिसरात पेयजलाचे विविध स्त्रोत उपलब्ध आहेत. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने ठक्कर बाप्पा योजनेतून डोंगर पायथ्याशी नवीन विहीर खोदण्यात आली असून या विहिरीला 25 ते 30 फुट पाणी आहे. त्या विहिरीतून पाड्यापर्यंत पाईपलाईनचे काम देखील पूर्णत्वास येत आहे, आज समक्ष ग्रामस्थांशी चर्चा करून त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी पंचायत समिती व अभियंता पाणी पुरवठा यांना या विहिरीत मोटार बसविणे व पाड्यापर्यंत पाण्याचा पुरवठा आजच तात्काळ सुरळीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, मौजे मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत महादरवाजामेट या पाड्याची लोकसंख्या अंदाजे 369 इतकी असून या पाड्यावरील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत आज (दि.5) रोजी मा. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या निर्देशाने संबंधित गावी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, सारिका बारी त्र्यंबकेश्वर गट विकास अधिकारी, अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मौजे महादरवाजामेट या पाड्याला लागून ग्रामपंचायतच्या मालकीच्या तीन विहिरी आहेत. त्यापैकी एक विहीर पाड्याच्या उत्तरेस पाचशे मीटर अंतरावर ज्यातून नियमित पाण्याचा वापर होतो. या विहिरीचे पाणी संपल्यानंतर पाड्याच्या पूर्वेस चारशे मीटर अंतरावर असणार्या दुसर्या विहिरीतून पाण्याचा वापर होतो.
संजय राऊत यांना ईडीचा दणका
मागील पंधरा दिवसापासून त्या विहिरीत पाणी कमी झाल्याने त्या ठिकाणी एक महिला विहिरीत उतरून पाणी भरत असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. या दुसर्या विहिरीच्या 100 मीटर अंतरावर पूर्वेस असणारी तिसर्या विहिरीत आज रोजी आठ ते दहा फूट पाणी असून हे पाणी पिण्यायोग्य नाही अशी ग्रामस्थांची धारणा आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याची ग्रामस्थांची धारणा असल्याने प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करून व गरजेनुसार त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी तसेच उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांना करण्यात आली आहे असे देखील प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…