नाशिक

सातपूरला अस्वच्छता पाहून मनपा आयुक्तांचा चढला पारा

सातपूर : मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त रमेश पवार हे आता ऍक्शन मोडमध्ये आले असून, सातपूरला काल अचानक पाहणी दौरा केला. या दौर्‍यात आयुक्तांना ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून आल्याने त्यांनी स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले.
मागील आठवड्यात सातपूर भाजप मंडळातर्फे सातपूर परिसरातील स्वच्छता तसेच विविध समस्यांबाबत निवेदन देत जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काल आयुक्त पवार यांनी अचानक या भागाला भेट देऊन पाहणी केली. छत्रपती शिवाजी भाजी मार्केट, नासर्डी पूल, प्रबुद्ध नगर, शिवाजीनगर आदी भागातील स्वच्छता नसलेल्या तसेच कचर्‍यामुळे निर्माण झालेल्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली.
मनपा आयुक्तांना ठीक ठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसून आल्याने आयुक्तांनी स्वच्छतेच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत अधिकार्‍यांना जाब विचारला. अशोक नगर भागात अनेक अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अमृत गार्डन ते बारदान फाटा रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत देखील पाहणी केली यानंतर चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेची पाहणी केली. यावेळी उपायुक्त करुणा डहाळे, विभागीय अधिकारी नितीन नेर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, आरोग्य अधिकारी डॉ.आवेश पलोड, नगर रचनाचे अगरवाल, आर एस पाटील अधिकारी उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago