नाशिक

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

 

उपमुख्यमंत्री फडणवीसः  एक लाख कोटींचा खर्च

नाशिक : प्रतिनिधी

पश्‍चिमी वाहिनीचे पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. मात्र, आता हे पाणी मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. यासाठी पाचशे किमीचे टनेलद्वारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणले जाईल. विदर्भातही पूर्व भागातून पश्‍चिम विदर्भात याच पद्धतीने वाहून जाणारे पाणी वळवले जाणार आहे. याद्वारे महाराष्ट्रासह मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न असेल. यासाठी एक लाख कोटीचा खर्च असला तरी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प बोलून

दाखवला.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, 2019 नंतर त्यांनी कुठल्याही प्रकल्पासाठी प्रयत्न केले नाही. त्यांनी सांगावे की, आम्ही राज्यासाठी काय केले. 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना पश्‍चिमी वाहिन्यांद्वारे वाहणारे पाणी मराठवाड्याकडे आणण्याकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार केला. त्यासाठी जल मंडलाची मान्यता घेतली. नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र या फाइलीवरील धूळही झटकली नाही. यांना सही होती, की समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून प्रकल्प मार्गी लावण्याची. केवळ डीपीआर करून मंजुरी मिळवायची होती. मात्र, त्यांना ते करायचे नव्हते. आमचे सरकार पुन्हा येताच याचवर्षी या प्रकल्पाची निविदा काढून हे पाणी गोदावरी खोर्‍यात आणायचे ठरवले आहे. नाशिक-नगर-मराठवाड्यात पाण्यावरुन होणारा संघ्रर्ष देखील यातून टाळला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात नळगंगा, वैनगंगाच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी वळवून पूर्व विदर्भाचे पाणी पश्‍चिम विदर्भात आणायचे आहे. या प्रकल्पांमुळे खर्‍या अर्थाने राज्यात जलक्रांती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा निर्णय फडणवीस यांनी म्हटले. कोल्हापूर व सोलापूरमध्ये दरवर्षी येणारा पूर रोखण्याकरिता जागतिक बॅकेशी बोलणे सुरू असून, या शहरातील पुराचे पाणी वळण बंधार्‍याचे पाणी तसेच टनेल व उजनीच्या माध्यमातून दुष्काळी मराठवाड्यात वळवण्यासाठी काम करणार आहोत.

नाशिक निओ मेट्रोचे प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यात

नाशिकमध्ये लवरकर नियो मेट्रो येणार आहे. पुढच्या आठवड्यात प्रेझेंटेशन केले जाणार आहे. नियो मेट्रो मेक इन इंडिया तत्त्वावर सुरू होणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाली असून, मेक इन इंडिया प्रोग्रामद्वारेच या ट्रेनची निर्मिती लातूर येथेच केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago