महाविकास आघाडीचे तीनतेरा

 

 

महाविकास आघाडीचे तीनतेरा : ना. महाजन यांची टीका

नाशिक : प्रतिनिधी

राज्यातील जनता कॉंग्रेसला कंटाळली, शिवसेनेत दहा-बारा आमदार राहिले. महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. या तिन्ही पक्षांतून कोण केव्हा बाहेर पडेल हे काहीही सांगता येणार नाही. तसेच राज्यात लवकरच कॉंग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल. त्याची सुरुवात कॉंग्रेसमध्ये दोन गट पडून झाली आहे, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

महाविकास आघाडीतले दहा ते 20 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे विधान शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आता राज्यात काहीही होऊ शकते.

येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहते की नाही? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षांचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची फक्त गंमत पाहतोय. पुढे ते म्हणाले की, आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते. कारण, कॉंग्रेसमध्ये आत्ताच दोन गट पडलेत, कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते कॉंग्रेसला कंटाळलेत. राज्यातील महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले असून, कोण केव्हा बाहेर पडेल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल, असे मत महाजन यांनी व्यक्त

केले.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago