दोन लाखांची लाच घेताना महावितरण अधिकारी जाळ्यात

नाशिक : प्रतिनिधी
बिलांमध्ये त्रुटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीच्या दोघा अधिकार्‍यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.  अमर अशोक खोंडे, व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग महावितरण कंपनी धुळे आणि मनोज अरुण पगार उप व्यवस्थापक अशी या दोघा लाचखोर अधिकार्‍यांची नावे आहेत.
तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांचे मंहावितरण कंपनीकडे 2018-19  या वर्षात 56,31, 590 रुपयांचे काम पूर्ण केले होते.  त्या कामाच्या सादर केलेल्या बिलात त्रुटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात  दोन्ही अधिकार्‍यांनी पाच लाख रुपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले.पहिला हफ्ता  दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, सुधीर मोरे,  रामदार बारेला,  मकरंद पाटील, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे यांनी ही कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

2 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

2 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

2 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

2 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

3 hours ago