तिचं असणं…!
राखी खटोड
तिच्या असण्याने येतो जीवनाला अर्थ ,
तिचं नसणं म्हणजे जीवनच व्यर्थ !
चार भिंतीच्या घराला तिच्या असण्याने येत घरपण,
घरातल्या खुशालीचा तीच असते दर्पण…
होळी असो की दिवाळी,
अंगणी असते सडा रांगोळी…
तिच्या आनंदी असण्याने
प्रत्येक सण साजरा होई .
तिचं विश्व म्हणजे फक्त तिचं कुटुंब ,
मनामध्ये प्रेम आणि माया असते तुडुंब…
सर्वांची आवड – निवड तिला असते ठाऊक,
प्रेमाचा व्यवहार तिचा असतो घाऊक..
आपल्या पिलांना ती जीवापाड जपते,
त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ती वाट्टेल ते करते…
आवभगत पाहुणे मंडळींचा करते मनापासून,
काम कोणतेही असो , तयार असते कंबर कसून…
जोडीदाराला असते हिची जन्मोजन्मीची साथ,
त्या साथीच्या बळावर करतात अनेक अडचणींवर मात…
प्रत्येक रूपात भासते तिची प्रेमाची सावली,
जीव ओवाळून टाकावा अशी ती माऊली…
तिच्या प्रसन्न असण्याने वास्तूत लक्ष्मी करेल वास,
सौख्य आणि आनंदाचे हे गुपित आहे खास…
नाही ती शोभेची वस्तू न व्हावा तिचा अनादर,
सत्कार नको तिला ,फक्त द्या प्रेमरूपी आदर…
ती आनंदी -सुखी संसाराचा मार्ग,
ती समाधानी तर घर बनेल स्वर्ग..
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…