नाशिक

प्रभाग सभापतिपदी महायुतीची एकहाती सत्ता

विरोधक चितपट; नाशिकरोड, पूर्वतही बिनविरोध

नाशिक : प्रतिनिधी
प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत महायुती भाजप-शिंदेसेनेने सहाही ठिकाणी एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना सत्तेबाहेर ठेवले. सहापैकी चार विभागांत सत्ताधार्‍यांसमोर एकही अर्ज आला नसल्याने तेथे भाजपच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. नाशिकरोडमधून उद्धवसेनेच्या प्रमिला मैंद व नाशिक पूर्वमधून काँग्रेसच्या नाजिया अत्तार यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, पुरेसेे संख्याबळ नसल्याचे पाहून उद्धवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभाग सभापतींच्या सहाच्या सहा जागांवर भाजप-शिंदेसेनेने एकहाती सत्ता मिळवली.
मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (दि. 30)स्थायी समितीच्या दालनात सहाही प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक पार पडली. विभागीय अपर आयुक्त अजय मोरे पीठासीन अधिकारी होते. नाशिक पूर्वसाठी भाजपकडून मंगला नन्नावरे व काँग्रेसकडून अत्तार नाजिया जाकीर यांनी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या मुदतीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा सभापती बिनविरोध निवडून आला. भाजपने नाशिकरोडची जागा शिंदेसेनेसाठी सोडल्याने येथे रमेश धोंगडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्याविरोधात उद्धव सेनेच्या प्रमिला मैंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, महायुतीकडे तेरा व उद्धवसेनेकडे दहाच नगरसेवक असल्याने मैंद यांनी माघार घेतली. या ठिकाणी पक्षाने रमेश धोंगडे यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. नाशिकरोडला शिवसेना ठाकरे पक्षाचे दहा नगरसेवक असल्याने त्यांनी प्रमिला मैंद यांना रिंगणात उतरवले. मात्र, युतीकडे बहुमत असल्याने शिंदेसेनेचा सभापती होणार हे निश्चित होते. अर्ज माघारीसाठी दिलेल्या मुदतीत शिवसेना ठाकरे पक्षाने पराभवाची नामुष्की टाळत अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्या ठिकाणी धोंगडे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक या ठिकाणी फक्त भाजप उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला होता. विरोधकांकडे बहुमत नसल्याने त्यांनी उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे या चारही जागांवर सभापतिपदी भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग सभापतींची निवड झाल्यानंतर त्यांचा महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते अजय बोरस्तेे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक पार पाडण्यासाठी नगरसचिव संजय नेरकर, मुकेश बैरागी, किशोर कोठावळे, राजू वर्मा, अजय शिरसाठ, सचिन निगळ, हुसेन यांनी काम पाहिले.

निवड झालेले सभापती विभागानुसार
नाशिक पूर्व : मंगला नन्नावरे
पश्चिम : सुरेश पाटील
पंचवटी : रोहिणी पिंगळे
नवीन नाशिक : बाळकृष्ण शिरसाठ
सातपूर : समाधान देवरे
नाशिकरोड : रमेश धोंगडे

Mahayuti’s unilateral power as ward chairman

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago