नाशिक

काम करतात पण कामगार नाही!

अंगणवाडी, आशा सेविकांचा अदृश्य संघर्ष

नाशिक : प्रतिनिधी
विविध क्षेत्रांतील कामगारांचा गौरव 1 मे रोजी कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, या सगळ्यामध्ये एक वर्ग कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे अंगणवाडीसेविका आणि आशासेविका. समाजाच्या आरोग्य आणि पोषण व्यवस्थेचा कणा असलेल्या या महिला प्रत्यक्षात दिवसभर मेहनत करतात. पण त्यांना कामगार म्हणून मान्यता नाही. शहर आणि ग्रामीण भागात एकूण 3 हजार 803 आशा वर्कर्स आहेेत आणि 5 हजार 705 ग्रामीण आदिवासी व नागरी अंगणवाडीसेविका आहेत.
सकाळी दिवसाची सुरुवात लवकर करून गावोगावी फिरत गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण मोहिमा, बालकांच्या आरोग्याची तपासणी, पोषण आहाराचे वितरण, विविध सर्वेक्षण अशा अनेक जबाबदार्‍या या सेविका पार पाडतात. शहर असो वा ग्रामीण भाग, आरोग्यव्यवस्थेचा पहिला संपर्क किंवा शेवटचा घटक म्हणून या आशा, अंगणवाडीसेविका काम करतात. कोविड काळात त्यांना फ्रंटलाइन वॉरियर म्हणून गौरविण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही त्यांच्या कामाच्या आणि हक्कांच्या बाबतीत बदल झालेला नाही. शासनाकडून त्यांना स्वयंसेवक म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्यांना नियमित कर्मचार्‍याप्रमाणे पगार, सामाजिक सुरक्षा, निवृत्तिवेतन, आरोग्य विमा यांसारख्या सुविधा मिळत नाही. कामाच्या तासांच्या मर्यादा नाही; परंतु मानधन अत्यल्प आहे. अनेकवेळा अतिरिक्त कामासाठी कोणतेही वेतन मिळत नाही, अशी तक्रार या सेविकांकडून केली जाते. या सर्व गोष्टींतून एकच प्रश्न पडतो, ज्या महिला दिवसाचे अनेक तास समाजासाठी काम करतात. त्या कामगार नाही का? कामगार दिनाच्या दिवशी त्यांच्या श्रमाचा गौरव का होत नाही? त्यांच्या कामाला सेवा म्हणून गौरवताना त्यामागील श्रम आणि हक्कांकडे दुर्लक्ष होत नाही का? अंगणवाडी, आशा सेविकांच्या संघटनांकडून त्यांना कामगार म्हणून मान्यता, किमान वेतन लागू करण्याची, तसेच सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याची मागणी वारंवार केली जाते. त्यासाठी वारंवार आंदोलने केली जातात. परंतु, या मागण्यांवर अजूनही गंभीर विचार केलेला नाही, हीच शोकांतिका आहे.

They work but are not workers!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago