44 गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत, लाखो लिटर पाणी वाया
चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले उड्डाणपुलाच्या भरावाचे काम आता चांदवडकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. कंत्राटदाराच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे चांदवड शहर आणि परिसरातील तब्बल 44 गावांची जीवनवाहिनी असलेली मुख्य जलवाहिनी शुक्रवारी कामादरम्यान अचानक फुटली.
जलवाहिनी फुटताच पाण्याचे उंचच उंच कारंजे हवेत उडाले होते. काहीच वेळात लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी महामार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात वाहून गेले. उन्हाळ्याच्या कडाक्यात आधीच पाण्याचे संकट गंभीर बनलेले असताना, यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त
होत आहे.
सध्या कडक उन्हाळा असल्याने संपूर्ण तालुक्यात आधीच पाणीटंचाईचे सावट आहे. अनेक गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच, कंत्राटदाराच्या चुकीमुळे ही मुख्य वाहिनी
फुटली आणि हजारो गॅलन पाण्याचा अपव्यय झाला. ऐन टंचाईच्या काळात झालेल्या या पाण्याच्या नासाडीमुळे चांदवड शहर
आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
या मुख्य पाइपलाइनवरून चांदवड शहरासह परिसरातील जोडलेल्या 44 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, ही वाहिनी थेट मधोमध फुटल्यामुळे या सर्व गावांचा पाणीपुरवठा तूर्तास पूर्णपणे खंडित झाला आहे.
काम युद्धपातळीवर करण्याची मागणी
घटना घडल्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेने तातडीने दखल घेत पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी जोरदार मागणी चांदवडकरांकडून केली जात आहे.
सध्या पाण्याचे भीषण संकट असताना, महामार्गाचे काम करणार्या यंत्रणेने काळजीपूर्वक काम करणे गरजेचे होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे.
– स्थानिक नागरिक, चांदवड
Main water pipe bursts in Chandwad city
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…