नाशिक

आश्रम, मठ, कुटियांना सुविधांसाठी शासनाचा हात आखडता

सिंहस्थ कुंभमेळ्यात आश्रमांचा महत्त्वपूर्ण सहभाग, भाविकांची सोय

त्र्यंबकेश्वर :
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या
निमित्ताने प्रत्येक साधू आखाड्याला 5 कोटी रुपयांची सेवासुविधांची विकासकामे शासनाने मंजूर केली आहेत. तथापि
त्र्यंबकेश्वर कुंभनगरीच्या धार्मिक उत्सवात महत्त्वपूणर्र् सहभाग राहिलेल्या आश्रम, मठ आणि कुटियापर्यंत अद्याप शासनाच्या मदतीचा हात पोहोचलेला नाही. नुकतेच मुंबई येथे झालेल्या साधू- महंतांच्या बैठकीत संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाखांचा निधी देणार असल्याचे जाहीर
केले आहे.
सिंहस्थ 2015 मध्ये आश्रमांना पक्के निवाराशेड आदींसह किमान 10 लाख रुपयांची विकासकामे मंजूर केली होती. बारा वर्षांनंतर वाढती महागाई पाहता 15 लाख रुपयांमध्ये कोणती कामे करायची, असा प्रश्न नियोजन करणार्‍या संस्थेला पडला आहे. वास्तविक पाहता, प्रत्येक आश्रमाला 50 लाखांचा निधी भक्तांच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातच नव्हे तर इतर सर्व कालावधीतदेखील धार्मिक स्थळावर आश्रम, मठ, कुटिया यांचे कार्य महत्त्वाचे आहे. भाविकांना खर्‍या अर्थाने सेवा पुरवण्याचे काम या संस्था करत असतात. विविध उत्सवांच्या प्रसंगी तीर्थक्षेत्रावर आलेले भाविक आश्रमांच्या संबंधित ओळख असल्यास तेथे वास्तव्यास राहतात.
भक्तांंच्या माध्यमातून आश्रमात सतत अन्नदान होत असते. ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा प्रसंगी भाविकांना आश्रय देतात. भक्तांच्या दानधर्मावर आश्रम, मठ यांचा कारभार सुरू असतो. त्यातही सुविधांची कामे दानशूर भाविक करत असतात. वर्षभर या आश्रमात भक्तांचा राबता असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यात तर भाविकांची संख्या वाढलेली असेल.
खासगी निवासाच्या अथवा भोजनाच्या सुविधा परवडत नाही अशा भक्तांना या आश्रमांचा आधार मिळतो. खासगी प्रवासी वाहनांनी आलेल्या भाविकांना वाहन उभे करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी तसेच ऊन, पावसापासून निवारा म्हणून आश्रम उपयुक्त ठरतात. तथापि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कायमस्वरूपी सुविधा उभारणे आवाक्याबाहेरचे असते. त्यासाठी शासनाने या आश्रम, मठ, कुटिया यांना मदत करणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात 75 आश्रम अथवा मठ आहेत. त्यांचे हजारो अनुयायी या आश्रमात राहतील व लक्षावधी भाविकांना त्याचा लाभ होईल.

प्रत्येक आश्रमास 50 लाखांच्या निधीची गरज

सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळ आणि त्यानंतर निरंतर भाविक या आश्रम, मठ, कुटिया यांचा लाभ घेतील. शासनाने त्यादृष्टीने विचार करावा आणि किमान 50 लाखांचा निधी प्रत्येक आश्रमाला उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यामधून स्वच्छतागृह, पेव्हर ब्लॉक अथवा काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जलकुंभ, निवाराशेड, भोजनगृह व स्वयंपाकगृह यांसारख्या सुविधा निर्माण करणे
शक्य होईल.

The government is working hard to provide facilities to ashrams, monasteries and huts.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago