नाशिक

नवरात्राचे उपवास करताना आहाराचे संतुलन महत्त्वाचे

नाशिक : प्रतिनिधी
नवरात्राच्या नऊ दिवसांत अनेक जण श्रद्धेने उपवास करतात. कोणी एकवेळ जेवण, तर कोणी दोन्ही वेळ फराळाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. पण उपवासाच्या नावाखाली साबूदाणा, बटाटा आणि तळलेले पदार्थ वारंवार खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्याएवजी कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढणे, आम्लपित्त, बद्धकोष्टता, पोट फुगणे आणि सुस्ती यांसारखा त्रास जाणवू शकतो. उपवास करताना केवळ कोणते पदार्थ खायचे याचा नाही, तर त्याचे प्रमाण आणि ते तयार करण्याची पद्धत यांचाही विचार करणे आवश्यक आहे.
नवरात्रात उपवास करताना अनेकदा साबूदाणा खिचडी, साबूदाणा वडा, बटाट्याचे पदार्थ, तळलेले पापड, चिप्स आणि शेंगदाण्याचे लाडू यांना प्राधान्य दिले जाते. हे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते. विशेषतः दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी एकाच वेळी भरपूर खाल्ल्यास पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते. उपवासाच्या काळातही शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वेे, खनिजे आणि इतर पोषक घटकांची गरज असते. त्यामुळे आहारात फळे, दूध, दही, पनीर, शेंगदाणे, मखाना, राजगिरा, भगर आणि कुट्टू यांसारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करता येतो.तळलेल्या पदार्थाऐवजी उकडलेले, भाजलेले किंवा कमी तेलात तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास आहार संतुलित ठेवता येतो. उपवास करताना दिवसभर पुरेसे पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे.खूप वेळ उपाशी राहणे आणि नंतर एकदम जास्त खाणे टाळावे.
उपवासाच्या पदार्थांत भरपूर तूप, तेल, साखर किंवा मीठ वापरण्याऐवजी त्याचे प्रमाण कमी ठेवावे. प्रत्येकाची शारीरिक गरज वेगळी असल्याने उपवासाचा आहारही प्रकृती आणि आरोग्याच्या गरजांनुसार ठरवणे आवश्यक आहे. उपवास म्हणजे केवळ काही पदार्थ टाळणे नसून योग्य आहार निवड आणि खाण्याच्या सवयीकडे लक्ष देण्याची संधी आहे. श्रद्धा आणि भक्ती जपत उपवासासोबत आरोग्याची काळजी घेतल्यास नवरात्राचा काळ अधिक उत्साहात साजरा केला जाऊ शकतो.

उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहणे किंवा केवळ साबूदाणा, बटाटा आणि तळलेले फराळाचे पदार्थ खाणे नव्हे. उपवासाच्या काळात शरीराला योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे फळे, दूध, दही, ताक, पनीर, राजगिरा, भगर यांसारख्या पदार्थांचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करावा. श्रद्धेसोबत आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
– क्षितिजा गायकवाड, आहारतज्ज्ञ

Maintaining a balanced diet is important while fasting during Navaratri.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago