नाशिक

बदलणार्‍या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम

सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा चटका; पारा 34.1 अंशांवर

हवामानाची नोंद (दि. 14 ऑक्टोबर)
किमान तापमान : 19.1 अंश सेल्सिअस
कमाल तापमान : 34.1 अंश सेल्सिअस

नाशिक : प्रतिनिधी
शहरात ऑक्टोबरमध्ये वातावरणातील बदल सातत्याने जाणवत आहे. सकाळच्या गारव्यानंतर दुपारी उन्हाचा चटका तीव्र होत आहे. तापमानातील या चढ-उताराचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. 14) शहराचे किमान तापमान 19.1 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 34.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. म्हणजेच दिवसातील किमान आणि कमाल तापमानात 15 अंशांचा फरक राहिला.
ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपत असतानाच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना दुहेरी वातावरणाचा अनुभव येत आहे. सकाळी आणि रात्री तुलनेने गारवा, तर दुपारी उष्णतेचा तीव्रपणा जाणवत आहे. या बदलामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवताना त्रास होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, बाहेर काम करणारे कर्मचारी व आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास होत आहे.

उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखीचा त्रास
दुपारच्या वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो. काही नागरिकांना घशात खवखव, सर्दी किंवा खोकल्याचाही त्रास होत आहे. मात्र, हा त्रास केवळ वातावरणातील बदलांमुळेच होतो असे नाही. पुरेशी विश्रांती न घेणे, कमी पाणी पिणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे यामुळेही आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

The Impact of a Changing Environment on Health

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago