पंचवटीत जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 110 एमएलडीपर्यंत वाढणार

पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील दिंडोरी रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राला सोमवारी (दि. 8) नाशिक पूर्वचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी भेट देऊन सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नव्याने उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रासह पंचवटी प्रभाग क्रमांक पाचसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभाचीही पाहणी केली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता सध्याच्या 60 एमएलडी वरून 110 एमएलडीपर्यंत वाढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परिसरात नवीन मुख्य वितरण जलाशय उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याद्वारे पंचवटीतील पाच पाण्याच्या टाक्या ग्रॅव्हिटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे पंचवटी परिसरातील पाण्याची कमतरता दूर होऊन नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे आमदार ढिकले यांनी सांगितले.
या कामांची पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना उर्वरित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावर अधिकार्‍यांनी निर्धारित वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पेठ रोड, मखमलाबाद रोड, दिंडोरी रोड तसेच पंचवटीतील गावठाण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊन हजारो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. यावेळी आमदार ढिकले यांच्यासमवेत माजी उपमहापौर तथा नगरसेवक गुरमितसिंग बग्गा, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, तसेच नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

Major improvement in Panchavati’s water supply; water treatment plant’s capacity to increase to 110 MLD.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *