मालेगाव येथील अव्वल कारकून लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
रेशन कार्ड मधील नोंदी ऑनलाईन करण्यासाठी 22 हजारांची लाच घेताना
मालेगाव येथील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र बळीराम दहिते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे मालेगाव येथील असून त्यांचा लाकूड खरेदी विक्री चा व्यवसाय आहे. ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. मालेगाव येथील 15 गरीब व गरजू कुटुंबाचे अंत्योदय आणि व पिवळे रेशन कार्डाची रेशन मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रार दार हे मालेगाव येथील धान्य वितरण कार्यालयात गेले असता अव्वल कारकून रवींद्र दहिते यांनी प्रत्येक कुटुंबाचे 1500 रुपये याप्रमाणे एकूण15 कुटुंबातील रेशन कार्डाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एकूण 22500 रुपये मागितले, तक्रारदार यांनी हे पैसे दहिते यांना दिले. त्यापैकी500 रुपये तक्रारदार यांना परत देत 22 हजार रुपये लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…