छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात
उद्या मुंबईत शपथविधी
नाशिक : प्रतिनिधी
मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांना अखेर पुन्हा मंत्रिपद मिळणार असून,  सकाळी दहा वाजता ते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजभवनात मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे.   राजभवनात 50 लोकांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी काल रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आल्या आहेत.

धनंजय मुंडेंचे खाते भुजबळांकडे?
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खाते राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
नाराजी दूर होणार?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळाले नव्हते.  त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचे दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्याला चार मंत्री
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला आता चौथे मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री आहेत. आता भुजबळ यांच्या रुपाने चौथे मंत्रिपद जिल्ह्याला मिळणार आहे. एकाच जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन मंत्री आता होतील.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago