दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे 25 ते 26 गावांना पाणी-पुरवठा करणारी प्रादेशिक पाणीयोजना सध्या पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनियमित व दूषित पाणी-पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आधीच पाणीटंचाई जाणवत असताना या योजनेतून होणारा पाणीपुरवठा 15 ते 20 दिवसांआड होत आहे. दीर्घकाळ पाइपलाइन बंद राहिल्याने त्यामधील पाणी दूषित होत असून, त्यात जीवजंतू निर्माण होत आहेत. परिणामी नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे.
सायने येथील जलशुद्धीकरण केंद्रातही पाण्याची योग्य शुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याचे समोर आले आहे. ठिकठिकाणी बसविण्यात आलेले वॉशआउट व्हॉल्व्ह निकृष्ट अवस्थेत असल्याने पाण्यात शेवाळ, माती व इतर अशुद्ध घटक मिसळले जात आहेत. पाण्याची पीएच व पीपीएम पातळी मानकांनुसार राखली जात नाही. यामुळे किडनी स्टोन, डायरिया, गॅस्ट्रो, सर्दी-ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, दहिवाळ-बोधे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सदस्य प्रा. हिरालाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली सायने जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. यात अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्या बेड्समधील वाळू दर सहा महिन्यांनी बदलणे आवश्यक असताना गेल्या वर्षभरात ती बदलण्यात आलेली नसल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
जलकुंभाची नियमित स्वच्छता न झाल्याने ते पूर्णपणे शेवाळलेले आढळले. या पार्श्वभूमीवर, पुढील काळात वेळेवर व शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास जलशुद्धीकरण केंद्रास टाळे लावण्याचा इशारा माळमाथा मित्रमंडळाने दिला आहे.
यावेळी ज्ञानेश्वर जाधव, संदीप शिंदे, समाधान चव्हाण, समीर आव्हाड, बाबाजी पवार, छगन सूर्यवंशी, शांताराम सोनवणे, अनिल वाघ आदी उपस्थित होते.
उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई.
15 ते 20 दिवसांआड पाणी.
सायने जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी.
अन्यथा रास्ता रोकोचा इशारा.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. नियमित व शुद्ध पाणी मिळत नसताना पाणीपट्टी मात्र शहरापेक्षा अधिक आकारली जाते. याविरोधात लवकरच रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.
– प्रा. हिरालाल नरवाडे
Malmatha water project in ruins
खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…
खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…
शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…
सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…
कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…