महागडी कार चोरी करणारा जेरबंद

आडगाव पोलिसांची यशस्वी कारवाई

नाशिक शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना बघता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्याची उकल करण्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथील दत्तनगर शिवकृपा स्वीट जवळील रो-हाउस येथील पंचवीस वर्षीय अभिनव नारायण वणसे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी (दि.1) रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचे चारचाकी वाहन ह्युंडाई वर्ना कार पार्क
केली होती.
सोमवारी (दि.2) सकाळी सहा वाजता ह्युंडाई वर्ना कार ही आढळून आली नाही. सदर वाहन राहत्या घराजवळून चोरी गेल्याचे समजले. अभिनव वनसे यांनी तत्काळ आडगाव पोलिस ठाणे गाठत सदर हकिगत सांगितली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर चोरी गेलेली कार ही अमरावती जिल्ह्यातील खोलापूर तालुक्यातील दर्यापूर गाव येथे असल्याचे समजले. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या परवानगीने आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार मनोज परदेशी, पोलिस अंमलदार अक्षय गोसावी यांना तात्काळ अमरावती येथे सदर गेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी रवाना होण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार गुन्हे शोध पथक हे अमरावती येथील दर्यापूर गावात गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संशयित ऋषिकेश तुकाराम मोरे यास ह्युंडाई वर्ना कार (क्रमांक एमएच 41 बीई 6957)सह ताब्यात घेतले.

यांनी बजावली कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पंचमुख, निकम, पोलिस हवालदार मनोज परदेशी, प्रदीप पाटील, पोलिस अंमलदार सचिन सानप, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *