अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई
सिडको : प्रतिनिधी
वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्या मुलींना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडीओ पाठवून त्रास देणे, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा अंबड युनिट तीनच्या पथकाने पेठ येथून ताब्यात घेतले. प्रसाद मारुती माळी (वय 21, रा. सोनेवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होत्या. आरोपी प्रसाद माळी याने त्यांना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडीओ पाठवून त्रास दिल्याचा आरोप आहे. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांनी गुन्हे शाखेला दिले होते.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पेठ येथे असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने पेठ येथील शिवांजली हॉटेल परिसरात सापळा रचला. तेथे आरोपी प्रसाद माळी याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा अंबड युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण तसेच भगवान जाधव, राजेश महाले, संजय बेनके, गौरव धात्रक, महेंद्र दोंदे, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली.
Man who sent obscene videos to girls and threatened them arrested
निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…
सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…
- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…
दुष्काळाच्या छायेत राज्य मंत्रिमंडळाचा दिलासादायक निर्णय मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…