नाशिक : प्रतिनिधी
अक्षय तृतीयेला महाग असलेला फळांचा राजा आंबा आता सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाली की आंबा खाण्याची ओढ आबालवृद्धांना लागते. फळांचा राजा असलेल्या आंब्याचे भाव प्रारंभी खिशाला न परवडणारे असतात. सर्वसामान्यांना आंबा विकत घेणे परवड नाही. मात्र अक्षय तृतियेला आंब्याचे महत्त्व असल्याचे भाव अधिक होते.सुरूवातीच्या काळात आंब्याची आवकही कमी होती. आता मात्र, आंब्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. महिन्याभरापूर्वी हापूस साडे तीनशे ते चारशे रूपये किलो नी विकला जात होता तो आता 100 ते 120 रुपयापर्यंत विकला जात आहे. कर्नाटकी हापूसची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.
यंदा मान्सूनचा अंदाज लवकर वर्तवण्यात आल्याने आंबा खराब होण्याची भीती असल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आंबे आले आहेत. हापूस आंबा 100 ते 150 रुपयांना विकला जात आहे . तर कर्नाटकी हापूस आंबा 90 ते 100 रूपयांना प्रति किलो विकला जात आहे. देवगड हापूस आंबाही 150 ते 200 रुपये किलो इतका खाली आला आहे. नाशिकमध्ये स्थानिक देशी आंब्यासह रत्नागिरीचा देवगड, केशर, कर्नाटकातील हापूस, आंध्र प्रदेशातून बदाम, लालबाग असे आंबे विक्रीसाठी येत आहेत.बाजारात राजापुरी आणि बदाम बरोबरच केशरची आवक मोठ्या प्रमाणात आहेत. राजापुरी आंबा 70 रुपये प्रतिकिलो राजापुरी आणि कलमी, नीलम आंबे विक्रीस आलेले नाहीत. नाशिकमधील मुख्य बाजारपेठेत आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. रविवार कारंजा परिसर, पंचवटी भाजी मार्केट, खडकाळी सिग्नलसह शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीस आले आहेत. तसेच विविध ठिकठिकाणी आंबा महोत्सव सुरु आहेत.त्याठिकाणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी करण्यात येत आहे.