नाशिक

मनमाड जंक्शनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

रेल्वेच्या ब्रिजवर चढला तरुण; आतापर्यंत ही चौथी घटना

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड जंक्शन स्थानक असून, रोज काहीना काही घटना घडत असतात. रेल्वेच्या ब्रिजवर एक तरुण चढला. तो तरुण कोण आहे, का चढला, याबाबत काहीच माहिती नाही. रविवारी सकाळी सव्वाआठ ते साडेआठदरम्यान मोठी गर्दी असते. याचवेळी तो ब्रिजवर चढला. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकाचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनमाड जंक्शन स्थानकावरील ही चौथी घटना आहे.
मनमाड जंक्शन स्थानकावर दिवसभरात हजारो शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा होते. हजारो प्रवासी मनमाड शहरातून येतात. यातून अनेकदा मनोरुग्ण किंवा गुन्हेगारी स्वरूपातील प्रवासीही असतात. काही महिन्यांपूर्वी मनोरुग्ण रेल्वे गाडीच्या छतावर उभे राहून हायव्होल्टेज वायरला पकडून घेतले. याआधी एका प्रवाशाने सहप्रवाशांवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. अशा एकना अनेक घटना मनमाड शहरातील रेल्वेस्थानकावर घडलेल्या आहेत. काल रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत एक तरुण रेल्वे ओव्हरब्रिजवर चढला. रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी जाऊन बसला. हा सर्व प्रकार प्रवाशांनी मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला. तरुण बराच वेळ तेथे बसला. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली. तरुणाला काढण्यासाठी शिडी लावली. मात्र, आपल्याकडे लोक येत असल्याचे बघून तो तरुण ज्या मार्गे वर चढला होता, त्याच मार्गाने पुन्हा पळून गेला. मुळात हा प्रकार घडला हे चुकीचे आहे. या सर्व प्रकारामुळे मनमाड रेल्वेस्थानकाची सुरक्षितताही नेमकी कोणाच्या भरोशावर आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago