मनमाडला विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी
मनमाड(आमिन शेख):- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मनमाड नांदगाव तालुक्यातील अनेक भागांत आज सकाळपासूनच पावसालासुरुवात झाली या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले सध्या मे महिना सुरू असुन अद्यापही अनेक ठिकाणी लग्न सराई सुरू आहे या पावसाने या लग्नाच्या कामात व्यत्यय आणला आहे
राज्यातील हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती मान्सून देखील 12 दिवस आधीच केरळ मध्ये दाखल झाला आहे याशिवाय यंदा 6 मे पासूनच पावसला सुरुवात झाल्याने वळवीचा पाऊस देखील पडत आहे त्यात हवामान खात्याने राज्यात रेड अलर्ट जारी केला तो अगदी तंतोतंत खरा ठरत असुन आज सकाळ पासूनच मनमाड नांदगाव तालुक्यात विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या पावसाने जनजीवन विस्कळीत केले असुन सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमाम्यांना याचा फटका बसला असुन मध्य रेल्वेचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे लांब पल्ल्याच्या गाड्या 2 ते 4 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे देखील हाल होत आहे.
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…