नाशिक

घरफोडी करणार्‍यांचा 12 तासांत लावला छडा

निफाड पोलिसांची कारवाई, संशयित जेरबंद

निफाड : तालुका प्रतिनिधी
पिंपळस रामाचे शिवारात भरदिवसा घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोंडा तोडून बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व लॅपटॉप चोरी करणार्‍या संशयितांना जेरबंद केले. अवघ्या बारा तासांत निफाड पोलिसांना यश आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे, रविवारी (दि. 25) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचारदरम्यान चोरट्याने पिंपळस रामाचे शिवारात गणपती मंदिराजवळील किरण चंद्रभान आहेर यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यात ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तसेच लॅपटॉप चोरी झाल्याची फिर्याद निफाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
परिणामी, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी सदर घटनेतील संशयितांचा शोध घेण्याबाबत निफाड पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी गुन्ह्यातील फिर्यादींकडे चौकशी केली व घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण व तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्ह्यातील संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सागर दत्तात्रय गरड (वय 33), पत्नी रोहिणी सागर गरड (वय 33, दोघेही रा. शिवकृपासमोर, आडगाव व पंचकृष्ण लॉन्ससमोर, सुखसागर बिल्डिंग कोणार्कनगर, आडगाव) त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्यातील स्विप्ट कार, लॅपटॉप, सोन्याची दागिने व मुद्देमाल काढून दिला.
चोरीनंतर अवघ्या बारा तासांत संशयिताना पकडण्यास निफाड पोलिसांना यश आल्याने पोलिसांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

 

चोरीतील हस्तगत मुद्देमाल

घटनेत 89 हजार 750 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, तसेच पाच हजार 920 रुपये किमतीचे

सफेद धातूचे तोरडी, तीन हजार 250 रुपये किमतीचे पायातील तोरड्या, एक हजार 680 रुपये

किमतीच्या धातूचे कडे, 760 रुपये किमतीचे जोडवे चार नग,

तीन लाखांची स्विप्ट कार, सहा हजार 200 रुपयांची रोकड,

तसेच पाच हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाइल,

तसेच 5000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल,

10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा मुद्देमाल निफाड पोलिसांनी हस्तगत केला.

Editorial Team

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago