महाराष्ट्र

काळ आला होता पण वेळ आली नव्हती..

अंगावरुन रेल्वे जाऊनही साधू बचावले

मनमाड  वार्ताहर
देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. अशीच काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना मनमाड रेल्वेस्थानकावर घडली. एक साधू गाडी पकडण्याच्या नादात रेल्वे ओलांडून जाताना रूळावर पडल्यानंतर संपूर्ण रेल्वेगाडी अंगावरून जात असताना अनेक प्रवासी नागरिकांचा थरकाप सुरू होता

पहा व्हिडिओ

 

. तर त्याला सुरक्षतेच्या भावनेतून सूचना करीत होते. त्यामुळे तो खाली पडून राहिल्याने बालंबाल बचावला.  याबाबत माहिती अशी की, रेल्वेलाइन ओलांडत असताना अचानक समोरून आलेली गाडी पाहून एका वयोवृद्ध साधूने चक्क लोहमार्गाच्या मधील जागेत स्वतःला झोकून दिले. पूर्ण गाडी त्यांच्या अंगावरून गेली पण त्यांना साधी जखमही झाली नाही आणि साधू महाराज बालंबल बचावले. सोमवारी दुपारच्या सुमारास मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक तीनवर ही थरारक घटना घडली. त्याचे झाले असे की, एका साधू महाराजांना वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे जायचे होते. या मार्गाकडे जाणार्‍या रेल्वे प्रवासी गाड्या या फलाट क्रमांक एक किंवा दोनवर येतात, पण साधू फलाट क्रमांक तीनवर उभे होते.

चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला पण….

गाडी फलाट क्रमांक दोनवर येणार, हे त्यांना समजल्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फलाटावरून खाली उतरून लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भुसावळकडून येणारी आणि मुंबईला जाणारी हैदराबाद-मुंबई-साकेत एक्स्प्रेस ही गाडी फलाटावर येत होती. समोर गाडी पाहून साधूने लोहमार्गाचा मधील मोकळ्या जागेमध्ये थेट झोपून घेतले. अवघ्या काही मिनिटांत जागृत नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर गाडी जागीच थांबली. त्यानंतर लोहमार्गाच्या मधोमध झोपलेल्या साधू महाराजांना अलगद बाहेर काढले. त्यांना काहीही इजा झाली नाही. पण जीव वाचला यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. त्यानंतर दुसर्‍या एका गाडीने साधू महाराज आपल्या इच्छित स्थळी रवाना झाले.

दोन वर्षानंतर गोदावरी एक्स्प्रेस लासलगाव स्थानकात दाखल 

Bhagwat Udavant

Recent Posts

सिडकोत शाळेसमोर युवकावर कोयत्याने वार

भावानेच केले बहिणीच्या प्रियकरावर धारदार कोयत्याने वार सिडको विशेष प्रतिनिधी :-पाटील नगरातील पेठे शाळेसमोर मंगळवारी…

3 hours ago

टायर फुटल्याने बिंग फुटले

टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे‌…

19 hours ago

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…

20 hours ago

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…

20 hours ago

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

21 hours ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

21 hours ago