अंगावरुन रेल्वे जाऊनही साधू बचावले
मनमाड वार्ताहर
देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. अशीच काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना मनमाड रेल्वेस्थानकावर घडली. एक साधू गाडी पकडण्याच्या नादात रेल्वे ओलांडून जाताना रूळावर पडल्यानंतर संपूर्ण रेल्वेगाडी अंगावरून जात असताना अनेक प्रवासी नागरिकांचा थरकाप सुरू होता
पहा व्हिडिओ
. तर त्याला सुरक्षतेच्या भावनेतून सूचना करीत होते. त्यामुळे तो खाली पडून राहिल्याने बालंबाल बचावला. याबाबत माहिती अशी की, रेल्वेलाइन ओलांडत असताना अचानक समोरून आलेली गाडी पाहून एका वयोवृद्ध साधूने चक्क लोहमार्गाच्या मधील जागेत स्वतःला झोकून दिले. पूर्ण गाडी त्यांच्या अंगावरून गेली पण त्यांना साधी जखमही झाली नाही आणि साधू महाराज बालंबल बचावले. सोमवारी दुपारच्या सुमारास मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक तीनवर ही थरारक घटना घडली. त्याचे झाले असे की, एका साधू महाराजांना वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे जायचे होते. या मार्गाकडे जाणार्या रेल्वे प्रवासी गाड्या या फलाट क्रमांक एक किंवा दोनवर येतात, पण साधू फलाट क्रमांक तीनवर उभे होते.
चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला पण….
गाडी फलाट क्रमांक दोनवर येणार, हे त्यांना समजल्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फलाटावरून खाली उतरून लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भुसावळकडून येणारी आणि मुंबईला जाणारी हैदराबाद-मुंबई-साकेत एक्स्प्रेस ही गाडी फलाटावर येत होती. समोर गाडी पाहून साधूने लोहमार्गाचा मधील मोकळ्या जागेमध्ये थेट झोपून घेतले. अवघ्या काही मिनिटांत जागृत नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर गाडी जागीच थांबली. त्यानंतर लोहमार्गाच्या मधोमध झोपलेल्या साधू महाराजांना अलगद बाहेर काढले. त्यांना काहीही इजा झाली नाही. पण जीव वाचला यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर दुसर्या एका गाडीने साधू महाराज आपल्या इच्छित स्थळी रवाना झाले.