’एफडीए’च्या धसक्याने अनेक हॉटेल्सचे शटर्स डाउन!

काहींनी नूतनीकरणासाठी तात्पुरत्या बंद ठेवल्या आस्थापना

नाशिक : प्रतिनिधी
भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत सणासुदीच्या काळात मावा, पेढे आणि मिठाईच्या नमुन्यांची तपासणी करून भेसळ करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता प्रशासनाने शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या आस्थापनांवर लक्ष केंद्रित केले आहे.
सायंतारा, हॉटेल श्यामसुंदर, तुषार मिसळ, विहार, महाराजा काठियावाड आणि कॅफे दुर्गा यांसारख्या प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई झाल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
हॉटेलमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वयंपाकघरातील स्वच्छता, कच्च्या मालाची साठवणूक, अन्नपदार्थ हाताळण्याची पद्धत, तसेच आवश्यक परवाने आणि अन्नसुरक्षा नियमांची पूर्तता या बाबी तपासणीच्या केंद्रस्थानी आहेत.
दरम्यान, ’एफडीए’च्या या मोहिमेचा हॉटेल व्यावसायिकांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. तपासणीदरम्यान त्रुटी आढळू नयेत आणि स्वच्छतेसह आवश्यक निकषांची पूर्तता व्हावी, यासाठी काही व्यावसायिकांनी हॉटेलच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. स्वयंपाकघराची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता आणि अंतर्गत सुविधांमध्ये बदल करण्याची लगबग सुरू झाली आहे. या कामांमुळे शहरातील काही हॉटेले तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.

प्रसिद्ध हॉटेलांवर कारवाई
सायंतारा, हॉटेल श्यामसुंदर, तुषार मिसळ, विहार, महाराजा काडियावाड आणि कॅफे दुर्गा या शहरातील परिचित हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाईचे स्वरूप व आढळलेल्या त्रुटींबाबत अधिकृत तपशील उपलब्ध झाल्यानंतर त्याची स्पष्टता येणार आहे.

Many hotels pull down their shutters, fearing the FDA!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *