मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लासलगाव सह निफाड पूर्व ४६ गावे कडकडीत बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लासलगाव सह निफाड पूर्व ४६ गावे कडकडीत बंद

लासलगाव:समीर पठाण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी लासलगाव शहरासह निफाड पूर्व ४६ गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.या वेळी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवार,लासलगाव बस आगाराच्या सर्व बस फेऱ्या यासह सर्व व्यवसायिक दुकाने,भाजीपाला बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.सर्व बस फेऱ्या तसेच खाजगी प्रवासी वाहने देखील बंद असल्यामुळे रोज ये जा करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

मराठा समाजाचा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शासनाला अक्षरशः हादरून सोडले आहे.चाळीस दिवसांची मुदत देऊनही शासनाने आश्वासनपूर्ती न केल्याने संयमाचा बांध फुटल्याने मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले आणि त्यांची प्रकृती ढासळली आहे.त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.

लासलगाव व परिसरातील अन्य सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाज आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने या समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,अशी भूमिका सर्व समाजाने मांडली आहे.लासलगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत.या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे.पुणे-लासलगाव ही हिरकणी एसटी बस पुणे येथून सोमवारी लासलगाव येथे येत असताना रात्री नैताळे येथे आक्रमक झालेल्या अज्ञात जमावाने या एसटी बस वर दगडफेक केल्यामुळे एस टी बस चे नुकसान झाले,मात्र सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही.

Bhagwat Udavant

Recent Posts

स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणेचा फज्जा; वाहतुकीला फटका

शहरातील 12 ठिकाणचे सिग्नल बंद; वाहनधारकांचा होतोय गोंधळ नाशिक : प्रतिनिधी शहरातील 60 पैकी 40…

33 minutes ago

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

3 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

4 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago