परिवहनमंत्री सरनाईक : टॅक्सी-रिक्षा चालकांचा समावेश
मुंबई :
आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत दिली. आता मुदत देणार नाही. राज्य सरकारकडून अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ज्यांना मराठी बोलता येणार नाही, त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
105 दिवसांमध्ये ज्या
अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान घेता आले अशा चालकांवर कारवाई होणार नाही, असे सरनाईक म्हणाले. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतील भाषा बोलता येणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय करणार्या चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असा आग्रह केला आहे. राज्य सरकारने सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी अनिवार्य केली आहे. राज्य सरकारने अमराठी चालकांना मराठी बोलता यावी, यासाठी आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यानंतर आता राज्य सरकारकडून येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून मराठी बोलता न येणार्या किंवा उद्दामपणे मराठी बोलण्यास टाळाटाळ करणार्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. आता मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देणार नाही, असे स्वत: परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे याबाबत आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणे
महत्त्वाचे ठरणार आहे. ही जबाबदारी आमची नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी
अनिवार्य आहे.
मराठीची शंभर टक्के सक्ती करणार
मराठीचे जुजबी ज्ञान हे यायलाच हवे. तेवढी मराठी तुम्ही शिकायलाच हवी. ही जबाबदारी आमची नाही. पण मानवतावादी दृष्टिकोनातून राज्य सरकारने जबाबदारी उचलली होती आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवत आहोत. चालकांसाठी वर्गही घेतले. तीन महिन्यांपूर्वीच राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य होणार होती. पण काही चालक संघटनांनी मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आला. विशेष म्हणजे, राज्य सरकारने अमराठी चालकांसाठी मराठी भाषा यावी यासाठी मराठी भाषेचे वर्गदेखील घेतले.
Marathi mandatory for drivers starting from Independence Day.