दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या अमली पदार्थ गांजाची विक्री करणार्या इसमांवर छापा टाकून कारवाई केली व 10 लाखांचा 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी पाडा, पोस्ट कोचरगाव परिसरात परिसरात दि.8 रोजी एक इसम हा अवैधरीत्या अमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून, अमली पदार्थ गांजाची अवैधरीत्या विक्री करणारा इसम चंदर नामदेव भरसट (रा. मु. तिल्लोळी, पो. कोचरगाव, ता. दिंडोरी) यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 10 लाख रुपये किमतीचा 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून, त्याच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इसम हा अमली पदार्थ गांजाची साठवणूक करून विक्री करत असल्याचे उघडकीस आलेले असून, सदरचा गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार
होता, याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोउनि सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदीप नागपुरे, आवा पिसाळ, माधव साळी, श्रीकांत गारूंगे, इम्रान पटेल, रवींद्र गवळी, मपोहवा ललिता शिरसाठ यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…