Oplus_16908288
नागरिकांचा रास्ता रोको; एक जण फरार, एकाला जेरबंद करण्यात यश
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्ग असलेल्या सेंट झेवियर हायस्कूलसमोर गोमांस घेऊन वाहतूक करणार्या एका गाडीचालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर गाडीत असलेले गोमांस रस्त्यावर ठेवून संबंधित आरोपीला अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यानंतर संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी संबंधित कार्यकर्त्यांना फोनवरून दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या रास्ता रोकोमुळे बिटको चौक ते नेहरूनगरदरम्यान वाहतूक खोळंबली होती. सदर घटनेप्रकरणी चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की श्रीरामपूर येथून इकोफोर्ड वाहनातून नाशिककडे गोमांस येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार बजरंग दलाचे उपजिल्हाध्यक्ष सोनू नागरे, प्रमुख पदाधिकारी श्रीकांत क्षत्रिय, संग्राम फडके, नितीन पाटील, कुणाल जाधव, कृष्णा साखला व पिंटू सिसोदिया यांनी शिंदे टोलनाका येथे जाऊन सिन्नरकडून येणार्या वाहनांवर लक्ष ठेवले व संशयित इकोफोर्ड वाहनाची प्रतीक्षा करू लागले. त्या दरम्यान एमएच 15 डीएस 7845 या क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या सिन्नरहून नाशिककडे येताना दिसले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाला शिंदे टोलनाका सोडल्यानंतर वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला; मात्र वाहनचालकाने त्याकडे दुर्लक्ष करून पळ काढला. सिन्नर फाटा, बिटको पॉइंट, नाशिकरोड व दत्तमंदिर सिग्नल परिसरात गर्दी असताना या वाहनचालकाने भरधाव वाहन चालवून स्वत:सह नागरिकांचा जीव धोक्यात घातला. अशा परिस्थितीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाचा थरारक पाठलाग करून ते अखेर उपनगर हद्दीतील जेतवननगरजवळील एका शाळेजवळ अडवण्यात यश मिळविले. गाडीचा चालक पळून गेला, मात्र त्याच्यासोबत असलेला सहकारी त्याला ताब्यात
घेण्यात आले.
दरम्यान, भररस्त्यावर गाडी थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक जमा झाले व त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे आढळून आले. परिणामी, संतप्त झालेल्या नागरिकांनी पकडण्यात आलेल्या युवकाकडून गोमांस बाहेर काढण्यात येऊन रस्त्यावर ठेवण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या दरम्यान मोठा गोंधळ झाल्याने संतप्त झालेल्या काही युवकांनी गाडीची प्रचंड प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. ही माहिती उपनगर पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक फुलपगारे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
ही माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांना देण्यात आल्यानंतर तेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संतप्त झालेल्या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत या प्रकरणाशी जे आरोपी संबंधित आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांच्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांच्या केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना फोन लावून बोलणे करून दिले. आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांंनी दिल्यानंतर आंदोलन मागे
घेण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची चौकशी केली असता त्याचे नाव शुभम जेजुरकर, रा. ममदापूर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदरचे गोमांस हे ममदापूर येथे राहणार्या अब्दुल कुरेशी नावाच्या इसमाने आम्हाला विक्री करण्यासाठी जमील कुरेशी (रा. नाशिक) याच्याकडे विक्री करण्यासाठी गाडीचालक नतिर शाह व मला पाठविले होते, मात्र नतीर हा फरार झाला, असे जेजुरकर याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जेजुरकर याच्या जबाबानुसार पोलिसांनी अरबाज अब्दुल कुरेशी (रा. राहाता, जि. अहिल्यानगर), जमील कुरेशी (रा. नाशिक), नसीर शहा (रा. ममदापूर, जि. अहिल्यानगर) व शुभम जेजुरकर (रा. ममदापूर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल
केला आहे.
याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अनिल भागवत शिंदे यांनी दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…