भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच आहे. खरंतर विवाह हा नववधूच्या आयुष्यातील एक आठवणीतला दिवसच आहे.
आज या विवाह संस्काराचे स्वरूप बदललेले पाहायला मिळते. विवाह सोहळा पूर्वीप्रमाणे फक्त विधी सोहळा राहिलेला दिसत नाही. आजचा विवाह म्हणजे थाटमाट, मोठी मेजवानी, फोटोसेशन, प्रत्येकाचे स्वतःचे मिरवणे, स्वतःचे वैभव दाखवणे. हे स्वरूप आज सर्व समाजात पाहायला मिळते.
असा हा विवाह संस्कार आपल्या कुटुंबसंस्थेचा एक महत्त्वाचा संस्कार. मात्र, आज विवाह जुळताना व जुळवताना काही प्रश्न समोर येत आहेत. विवाह जुळून येण्याचा विषय कुटुंबासमोर आला की, प्रत्येक समाजात थोड्याफार प्रमाणात लग्नासाठी मुली न मिळणे, मुलींची संख्या कमी असणे, असे विषय ऐकायला मिळतात. यामागे मुलींच्या व त्यामागे पालकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्टेटसप्रमाणे मुलाचा शोध, विभक्त कुटुंबाला पसंती, सरकारी किंवा चांगल्या पगाराची नोकरी, मुलाचे स्वतःचे घर किंवा फ्लॅट, शेती, गाडी असणार्याला पसंती, मुलगा शहरात राहणारा हवा, मुलगी आपल्या शहरात देण्याचा आग्रह इत्यादी. यातून विवाह लवकर जुळण्यास ब्रेक लागताना दिसत आहे.
या सर्वांमध्ये आपली मुलगी सुखात राहावी ही भावना जरी चांगली असली, तरी आपल्या अपेक्षा कधीकधी वास्तवाला धरून दिसत नाहीत. आज शिक्षण आहे, पण स्पर्धा आहे. सरकारी नोकरी सर्वांनाच मिळणे कठीण आहे, याचाही विचार व्हायला हवा.
मुलींच्या आई-वडिलांप्रमाणे मुलांच्या व त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्षाही विवाह जुळताना समोर येतात. मुलगी सुंदरच हवी, आपल्या स्टेटसप्रमाणे हवी, आपल्या मुलाचा शिक्षणाचा खर्च लग्नातून भरून निघावा, विवाहात मुलींकडून महागड्या भेटवस्तू, थाटामाटात लग्न लावून देणे या अपेक्षा. यातूनही अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. ही परिस्थिती, या अपेक्षा मुलाकडच्या किंवा मुलीकडच्या शंभर टक्के सर्वत्र असतील असे नाही.
या विषयाच्या बाबतीत समाजात मतमतांतरे आहेत. काहींच्या मते मुली न मिळण्याची ही परिस्थिती गेल्या काही वर्षांत वाढली आहे. मुलींचे प्रमाण कमी आहे, हे नक्की आहे. मुली शिकत आहेत, स्वतःचे करिअर स्वतःच्या पायावर बनवत आहेत. त्यासाठी पालकांचे स्वातंत्र्य आहे. शिक्षण, करिअर यासाठी त्या घराबाहेर पडत आहेत. घराबाहेरील वातावरणातून त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा काही प्रमाणात गैरअर्थ घेत आहेत. यातून पालकांपेक्षा स्वपसंतीला, स्वनिर्णयाला जास्त महत्त्व देत आहेत.
काही म्हणतात, मुलींच्या अपेक्षा या खर्या त्यांच्या नसून, आई-वडिलांच्या आहेत. मुलांच्या किंवा मुलींच्या आई-वडिलांचे विचार हे परस्परांमधील अपेक्षांबाबत जुळत नाहीत. त्यातूनही विवाह लवकर जुळत नाहीत.
या सर्वांत असेही कुटुंब आहेत की, जिथे घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने, शिक्षण कमी असल्याने, वय वाढल्याने मुलींच्या अपेक्षा वाढल्याने विवाह होत नाहीत. त्यांचे पालक या समस्येमुळे हतबल झाले आहेत. यातून सर्व समाजातील अशा परिस्थितीतील कुटुंबे विवाह जुळवणार्या फसव्या लोकांच्या मागे लागून आर्थिक नुकसान, मानसिक ताणतणाव आदीला सामोरे जात आहेत. या परिस्थितीचा फायदा फसवी विवाह मंडळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सर्रास करून घेताना दिसतात.
खरंतर या लेखाचा विषय शुभमंगल सावधान ठेवण्यामागे या समस्येचा विचार समोर ठेवण्याचा आहे.
सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने, धार्मिक दृष्टीने विवाह हा संस्कार प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचे वळण असते, पण यात एका बाजूला मुली न मिळणे, मुलींचे व मुलांचे लग्नाचे वय निघून जाणे, मुलांच्या व मुलींच्या घरच्यांचा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुलींच्या अवास्तव अपेक्षा प्रत्यक्ष सत्य परिस्थितीचा स्वीकार न करणे, न समजणे, मुला-मुलींचे घरातील लोकांच्या विरुद्ध न जाणे, पण कालांतराने आपल्या मनाप्रमाणे प्रेमप्रकरणातून इतर कोणाशीही संसार करणे, या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टी सर्वत्र थोड्याफार प्रमाणात दिसत आहेत. यासाठी समाजातील, कुटुंबातील ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांचा पालकांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार हवा. पालकांनी मुलांचे विश्व, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत. मुलीच्या विवाहाच्या वेळी ठेवलेल्या अपेक्षा आपल्या मुलाच्या विवाहावेळी इतरांनी केल्यावर कोणते प्रश्न, त्रास होतो, याचा विचार करायला हवा.
मुला-मुलींनीही विवाह हा खेळ नाही, विवाह म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात, दोन भिन्न कुटुंबांचे एकत्रीकरण, योग्य वेळी विवाह म्हणजे पुढील वैवाहिक आयुष्याची योग्य सुरुवात, हे समजून घ्यायला हवे. विवाह जुळताना या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातून मुलांचे व मुलींचे दोघांच्या जीवनाला वेगळे वळण वेगळे संस्कार मिळत आहेत. या सर्वांतून सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. ही परिस्थिती माझ्या लेखाने लगेच सुधारेल असे नाही, पण विवाह जुळताना आज समाजात काय चित्र आहे, हा विचार मात्र नक्कीच सर्वांसमोर जाईल.
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…