नाशिक

माळेगाव एमआयडीसीत पेपर रोल कंपनीला भीषण आग

12 तासांनंतरही आग धुमसतीच; लाखो रुपयांचा कच्चा माल खाक

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या धनश्री पेपर रोल (प्लॉट नं. जी-5) या पेपर रोल बनवणार्‍या कंपनीत मंगळवारी (दि. 3) मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या रद्दी पेपर व कागद बनवण्याच्या कच्च्या मालाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कागद स्वरूपातील साहित्य असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. मध्यरात्री लागलेली ही आग मंगळवारी दुपारपर्यंत धुमसत राहिल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धनश्री पेपर रोल कंपनीच्या शेजारीच हिंदुस्तान पेट्रोलियमचा एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांट असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तत्काळ कामाला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव, एमआयडीसी, सिन्नर नगरपरिषद, नाशिक महानगरपालिका व हिंदुस्तान पेट्रोलियमचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सकाळी सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी दुसर्‍या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत ठिकठिकाणी आग शिलगत होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कंपनीचे मालक भावेश पटेल व व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी सांगितले. मात्र, या आगीत लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला असून, नुकसानीचा अचूक अंदाज आलेला नाही.

Massive fire breaks out at paper roll company in Malegaon MIDC

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago