सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान
सातपूर : प्रतिनिधी
नाशिकच्या गंगापूररोड परिसरात असलेल्या स्पाइसी यार्ड या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा यावेळी दिसून येत होत्या. या घटनेमुळे एकच भीतीचे वातावरण पसरून मोठी धावपळ उडाली होती. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
या आगीत मोठ्या प्रमाणावर सामान जळून खाक झाल्याने सुमारे 12 लाख रुपयाचे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे, तर सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. या घटनेचा पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.
Massive fire breaks out at Spicy Yard Hotel on Gangapur Road