Oplus_131072
रुग्णालयातील नवजात शिशूंसह रुग्णांची थरारक सुटका; रुग्णवाहिकेसह वाहने जळून खाक
♦ स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण.
♦ ऑक्सिजन फुटण्याच्या भीतीने घबराट.
♦ रुग्णांना अन्यत्र हलविले.
♦ स्थानिक नागरिकांची मदत.
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील दुर्गा उद्यान परिसरातील स्टार प्लस मॉलमध्ये मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. मॉलच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. या मॉलमध्ये अनेक रुग्णालये असल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत दोन लॅडरच्या सहाय्याने नवजात बालके आणि रुग्णांना सुखरूप बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास स्टार प्लस मॉलच्या पार्किंगमधून धूर येण्यास सुरुवात झाली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. बेसमेंटमध्ये उभी असलेली रुग्णवाहिका आणि अन्य दोन वाहने या आगीत जळून खाक झाली. वाहनांच्या टायरचा आणि साहित्याचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीचे गांभीर्य ओळखून मुख्यालय, के. के. वाघ, सातपूर आणि सिडको केंद्रावरून अतिरिक्त बंब पाचारण करण्यात आले. दलाचे श्रीकांत नागपुरे, आर. आर. काळे, फकीरा भालेराव, लक्ष्मीकांत बेंद्रे, हिरे, मैंद, शिंदे, सुखदान, पुरी, निकम, युवराज पाटोळे, यश व्यवहारे, राजाभाऊ गोसवी या पथकाने जीवाची पर्वा न करता मदतकार्यात झोकून दिले.
या मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आणि दवाखाने आहेत. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचार्यांची धावपळ उडाली. आगीच्या धुरामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, ऑक्सिजन सिलिंडर फुटण्याच्या भीतीने नातेवाईक भयभीत झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने दोन लॅडरच्या (शिडी) सहाय्याने नवजात शिशूंना बाहेर काढले. गंभीर अवस्थेतील रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना स्ट्रेचरवरून खाली उतरवले. तातडीने इतर रुग्णवाहिकांमार्फत या रुग्णांना जवळच्या दुसर्या रुग्णालयात हलवण्यात आले.
या आगीचे वृत्त वार्यासारखे पसरल्याने घटनास्थळी हजारो बघ्यांनी गर्दी केली होती. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचण्यास व मदतकार्य करण्यास अडथळा निर्माण झाला. अखेर पोलिसांनी गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत केली. काही स्थानिक नागरिकांनी मात्र अग्निशमन दलाला मदत करत रुग्णांना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तास लागले.
Massive fire breaks out in basement of mall on Nashik Road
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…