महाराष्ट्र

राज्यात 1,539 जागांसाठी बंपर तलाठी भरती

अतिरिक्त 1,459 गट-क क्लार्क-टायपिस्ट आणि इतर पदांसाठीही संधी

नाशिक : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)ने स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या लाखो तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. एमपीएससीतर्फे घेण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2026’ च्या जाहिरातीत सुधारणा करण्यात आली असून, आता यामध्ये महसूल व वन विभागांतर्गत ‘ग्राम महसूल अधिकारी’ म्हणजेच ‘तलाठी’ पदाच्या तब्बल 1,539 नवीन जागांची भर घालण्यात आली आहे.

भरतीचे स्वरूप
तलाठी पदाच्या या नव्या 1,539 जागांच्या समावेशामुळे, आता एमपीएससी गट-क अंतर्गत भरल्या जाणार्‍या एकूण पदांची संख्या वाढून थेट 5,707 इतकी झाली आहे. उमेदवारांची वाढती संख्या आणि नवीन पदांची भर लक्षात घेता, आयोगाने उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढदेखील दिली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
शिक्षण : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराच्या वयाची गणना ही 5 ऑगस्ट 2026 या तारखेनुसार ग्राह्य
धरली जाईल.
गट-क अंतर्गत भरण्यात येणारी इतर पदे
तलाठी पदाव्यतिरिक्त गट-क परीक्षेतून खालील महत्त्वाच्या पदांचीही भरती होणार आहे:
लिपिक-टंकलेखक (क्लार्क टायपिस्ट) : 1,194 पदे (नागरी पुरवठा, अन्न व ग्राहक संरक्षण, आदिवासी विकास तसेच महसूल व वन विभाग)
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) : 254 पदे (यासाठी बीएफएससी पदवी आवश्यक)
वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक : 11 पदे
सहाय्यक अधीक्षक : 11 पदे
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 ऑगस्ट 2026 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 8 ऑगस्ट 2026 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
परीक्षेचा दिनांक : 25 ऑक्टोबर 2026 (ही परीक्षा ऑनलाइन नसून, ओएमआर आधारित ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.)

Massive Talathi recruitment drive in the state for 1,539 posts.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शिक्षण हक्काचं की संघर्षाचं

- ज्योती काळे- जाधव तरुणाईच्या डोळ्यांत स्वप्नं, मनात नवी उमेद आहे, तरी तिच्याच भविष्याभोवती आज…

1 day ago

आक्रोशाची नांदी

- सीमाताई मराठे देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली…

1 day ago

मोदी-ताकाईची संवाद

- समाधान कदम भारत-जपान भागीदारीला मैत्रीचा आधार जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांनी 1 जुलै ते…

1 day ago

जंतर-मंतरचा ‘मंतर’

- राजेश शिरभाते न्यूटनचा नियम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक क्रियेला त्यापेक्षाही जोरदार अशी प्रतिक्रिया…

1 day ago

धरण उशाशी तरी प्रभाग 9 उपाशी!

दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा नाशिक : प्रतिनिधी दुष्काळाचे सावट दूर होऊन…

1 day ago

रस्त्यावर उतरलेली तरुणाई लोकशाहीतील मोठ्या बदलाची नांदी!

न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान उच्चारला गेलेला ‘झुरळ’ हा शब्द, सोशल मीडियावर तयार झालेली कॉक्रोच जनता पार्टी,…

1 day ago