नाशिकरोड :प्रतिनिधी
माथाडी कामगारांना घरे द्यावीत, रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा द्याव्यात, माथाडी कामगारांवर दहशत करणा-या गुंडांना आळा घालण्यासाठी समिती नेमावी. अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे आंदोलन करण्यात आले. प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगार नेते सुनिल यादव व हिरामण तेलोरे यांनी दिला आहे.
संघटनेने केलेल्या मागण्यात म्हटले आहे कीं, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन कामगार प्रतिनिधी नेमावा, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे,माथाडी कायदा व विविध माथाडी
मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती करावी. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, हिरामण तेलोरे, कैलास भालेराव, नाना खरे, स्वरूप वाघ, किशोर गांगुर्डे, शब्बीर सय्यद, संजय भोगळ, दिलीप दाते, वजीर शेख, सुनील मोकळ, रमेश कोठावळे, राकेश सिंग, संतोष वाकळे, नामदेव शिरसाठ, विकास पदुळकर, कमलाकर पगारे, शिवाजी फलके, संदीप गुंजाळ, अंकुश धिंदळे आदी उपस्थित होते. आंदोलनास महात्मा ज्योतीबा फुले राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आंदोलनाला पाठिबा दिला.
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.