सिंहस्थ निर्विघ्न पार पडू दे

महापौरांचे गोदामातेला साकडे

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पाश्वभूमीवर सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. दरम्यान, सिंहस्थ निर्विघ्नपणे पार पडू दे, असे साकडे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गोदामातेला घातले आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर शास्त्रोेक्त पद्धतीने तीर्थपूजन करून सिंहस्थ महापर्व मंगलमय आणि निर्विघ्न पार पडावे, यासाठी गोदामातेला साकडे घालण्यात आले.
पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर आणि श्री कपालेश्वर मंदिर येथे सिंहस्थाची पहिली निमंत्रणपत्रिका अर्पण करून दर्शन घेण्यात आले. सिंहस्थ हा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असून या पर्वाच्या तयारीला धार्मिक विधींनी सुरुवात करताना प्रमुख मंदिरांत निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली. त्यानंतर त्रिवेणी संगमावर पूजन करून आगामी सिंहस्थासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक उपक्रमाला वैष्णवी आखाड्याचे प्रवक्ते डॉ. भक्तिचरणदास महाराज, प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि प्रदीप चौधरी उपस्थित होते. यावेळी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सरचिटणीस प्रतीक शुक्ल, काळाराम मंदिराचे विश्वस्त अक्षय कलंत्री, शांताराम अवसरे, धनंजय पुजारी आणि दिगंबर धुमाळ यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

May the Simhastha proceed without any obstacles.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *