महापौरांचे गोदामातेला साकडे
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पाश्वभूमीवर सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. दरम्यान, सिंहस्थ निर्विघ्नपणे पार पडू दे, असे साकडे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गोदामातेला घातले आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर शास्त्रोेक्त पद्धतीने तीर्थपूजन करून सिंहस्थ महापर्व मंगलमय आणि निर्विघ्न पार पडावे, यासाठी गोदामातेला साकडे घालण्यात आले.
पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर आणि श्री कपालेश्वर मंदिर येथे सिंहस्थाची पहिली निमंत्रणपत्रिका अर्पण करून दर्शन घेण्यात आले. सिंहस्थ हा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असून या पर्वाच्या तयारीला धार्मिक विधींनी सुरुवात करताना प्रमुख मंदिरांत निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली. त्यानंतर त्रिवेणी संगमावर पूजन करून आगामी सिंहस्थासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक उपक्रमाला वैष्णवी आखाड्याचे प्रवक्ते डॉ. भक्तिचरणदास महाराज, प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि प्रदीप चौधरी उपस्थित होते. यावेळी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सरचिटणीस प्रतीक शुक्ल, काळाराम मंदिराचे विश्वस्त अक्षय कलंत्री, शांताराम अवसरे, धनंजय पुजारी आणि दिगंबर धुमाळ यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
May the Simhastha proceed without any obstacles.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन नाशिक : प्रतिनिधी भारताच्या विकासासाठी तरुणांची ऊर्जा योग्य…
नाशिक : धर्मध्वज मिरवणूक व ध्वजारोहणानिमित्त गोदाघाट आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. (छाया :…
राज ठाकरे : कर्जतच्या सभेत सरकारविरोधात आक्रमक; झाडे तोडलेली पाहून दु:ख कर्जत : प्रतिनिधी भीमाशंकर-कर्जत…
33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मिळणार अग्रिम 5 हजार मुंबई : प्रतिनिधी दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्यांना…
- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…
- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…