राज ठाकरे : कर्जतच्या सभेत सरकारविरोधात आक्रमक; झाडे तोडलेली पाहून दु:ख
कर्जत : प्रतिनिधी
भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॉट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. 28) कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते, असे सांगून राज यांनी वृक्षतोड आणि परिसराची दुर्दशा पाहून खंत व्यक्त केली. ते म्हणाले, की झाडे पाहून वाटले की, आपण जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय!
आज जंगलतोड झाली तिथे गेलो होतो, तोडलेली लाकडं रचून ठेवली होती. ते बघताना मला वाटलं जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे. इतक्या वर्षांची जुनी झाडे, कोणत्या तरी गुजरात्यासाठी म्हणून कापून टाकत आहेत. पक्षी घिरट्या घालत होते, आज पक्षी घिरट्या घालत आहेत, उद्या तुमच्यावर घिरट्या घालायची वेळ येणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
केंद्राने आणि खासगी कंपनीने ठरवून तो प्रस्ताव आम्हाला दिला, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. महाराष्ट्रात काय करायचं, काय नाही हे सगळे दिल्लीमध्ये ठरते. उद्योगपती थेट दिल्लीला जाऊन मोदी-शहांना भेटतात आणि जमीन मागतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का? माता-भगिनींना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेतून, तुम्हाला विकत घेतले जात आहे आणि तुमची तोंडे बंद केली जात आहेत. 30-35 टक्के जनता आणि बाकी निवडणूक आयोग आहेच.
23 प्रकल्पांचा पर्दाफाश
राज ठाकरे म्हणाले, हा एकटा प्रकल्प नाही. सह्याद्रीच्या कुशीत असे 23 प्रकल्प येणार आहेत. यातले 3 केंद्राचे, बाकी 20 अदाणी, टोरंट, रिन्यू, मेगा, ग्रीनको यांचे खासगी प्रकल्प आहेत. टेंडर नाही, काही नाही, बस असेच देऊन टाकले. महाराष्ट्रात एकूण 236 वीज प्रकल्प येत आहेत, हे सगळं डेटा सेंटरसाठी बाहेरच्या लोकांसाठी चाललं आहे. दरम्यान, या सभेपूर्वी राज ठाकरे यांनी साय डोंगरावर जाऊन तोडलेल्या झाडांची पाहणी केली आणि आदिवासी ग्रामस्थांशी संवाद साधला.
What should and should not be done in Maharashtra is decided from Delhi.
नाशिक : धर्मध्वज मिरवणूक व ध्वजारोहणानिमित्त गोदाघाट आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. (छाया :…
महापौरांचे गोदामातेला साकडे नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पाश्वभूमीवर सुरू असलेली कामे अंतिम…
33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मिळणार अग्रिम 5 हजार मुंबई : प्रतिनिधी दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्यांना…
- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…
- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…