भालजवळ कारवाई, दोघे अटकेत, गुन्हा दाखल
शहापूर ः प्रतिनिधी
उल्हासनगरजवळच्या भाल येथील सीताराम म्हात्रेनगर या परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 17 लाखांचा मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जय संजय रेवगडे आणि साहिल किरण कांगणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडे अमली पदार्थ सापडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर परिमंडळ चारच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीबाबत अनेक गुन्हे दाखल होत असताना ही कारवाई गुन्हे शाखेने केल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिमंडळ चारमध्ये अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अमली पदार्थाच्या आहारी तरुण पिढी गेल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक शौचालये, मोकळी मैदाने, निर्जन ठिकाणी अनेक तरुणांना पोलिसांनी अमली पदार्थ असलेल्या गांजा सेवन करताना पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केला होता. त्यानंतर भगतसिंगनगर परिसरात एकाच आठवड्यात दोनदा कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. यातही हजारो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
परिमंडळ चारच्या क्षेत्रात या घटना सातत्याने होत असताना पोलिसांकडूनही कारवाई होते आहे. मात्र, असे असतानाही अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते पदार्थ बाळगण्याचे प्रकार समोर आले आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…