नाशिक

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद

नाशिक ः प्रतिनिधी
गुजरातमधील राजकोटच्या धर्तीवर महापालिकेने तब्बल बत्तीस कोटी रुपये खर्च करून चार यांत्रिकी झाडू खरेदी केलेले आहेत. मे 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान शहरातील 55 हजार 689 किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता या यांत्रिकी झाडूंद्वारे केल्याचा दावा घनकचरा विभागाने केला आहे. दरम्यान, कोट्यवधींचे हे झाडू पावसाळ्यात फेल होणार असून, पुढील चार महिने रस्ते सफाईचे काम बंद राहणार आहे. मात्र, यावरून कोट्यवधीचे यांत्रिकी झाडू काय कामाचे, असा सवाल केला जात आहे.
शहरातील दुभाजके, रस्त्यावरील धूळ, फुटपाथ, कचरा यांत्रिकी झाडू प्रेशरद्वारे गोळा करून रस्त्यांची रात्रीच्या वेळी सफाई केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात यांत्रिकी झाडूला रस्तेसफाई करताना पावसामुळे अडचणी येतात. पाण्यामुळे रस्त्यावर, दुभाजक व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. चिखलामुळे यांत्रिकी झाडूने सफाई होऊ शकत नाही. सफाई केली तरी चिखलामुळे यांत्रिकी झाडूचे भाग खराब होऊन मशिनमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च सोसावा लागेल. ते पाहता पावसाळ्यात यांत्रिकी झाडूने साफसफाई बंद ठेवली जाईल.
सध्या पावसाने उसंत घेतल्याने रात्रीच्या वेळी यांत्रिकी झाडू स्वच्छतेचे काम सुरू आहे. कोरडे वातावरण असल्यास यांत्रिकी झाडूने साफसफाई केली जाईल. पाऊस सक्रिय होताच रस्ते सफाई थांबवली जाईल. चिखलामुळे रस्त्यावरील घाण व माती गोळा करण्याचे काम यांत्रिकी झाडू करू शकणार नाहीत. तसे केल्यास चिखलामुळे यंत्रात बिघाड होईल. त्यामुळे यांत्रिकी झाडूंना पुढील चार महिने आराम दिला जाणार आहे. झाडूंवर महिन्याला होणार्‍या 36 लाख रुपये खर्चाची बचत यामुळे होणार आहे. नोव्हेंबर 2023 पासून यांत्रिकी झाडूने स्वच्छतेला सुरुवात झाली. प्रारंभी या झाडूंचा वेग संथ होता. नंतर वेग घेतला. रोज आठ तासांप्रमाणे महिन्याला किमान चार ते पाच हजार किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता यांत्रिकी झाडूने होत आहे. यांत्रिकी झाडू वाहनावर दोन कर्मचारी असून, गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी सोबत छोटे वाहन असते.

शहरात यांत्रिकी झाडूद्वारे रस्ते सफाई सुरू आहे. मात्र, पावसाळ्यात चिखलामुळे सफाई शक्य नाही. यंत्रात बिघाड होऊ शकतो. सध्या पाऊस सुरू नसल्याने स्वच्छता केली जाईल. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतर यांत्रिकी झाडू बंद ठेवले जातील.
– अजित निकत, प्र. संचालक, घनकचरा विभाग, मनपा

   

   वर्षभरातील स्वच्छता
महिना          एकूण स्वच्छता
मे 2024            5,472
जून                4,823
जुलै               3,558
ऑगस्ट             2,327
सप्टेंबर             3,269
ऑक्टोबर           4,581
नोव्हेंबर            5,161
डिसेंबर             5,302
जानेवारी 2025       5,302
फेब्रुवारी            5,254
मार्च              5,346
एप्रिल             5,290
Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

13 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

19 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

19 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

20 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

2 days ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

2 days ago