नाशिक

जिद्दीच्या बळावर मीना लांडगे यांची सुसाट भरारी

स्वतःचे दागिने गहाण ठेवून उभा केला व्यवसाय

नाशिकरोड : अनिल गुंजाळ
वाहन चालविण्याची लहानपणापासून आवड, परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची जिद्द, या बळावर मीना भगवान लांडगे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला बसचालक म्हणून ओळख असलेल्या मीना यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून अर्बानिया गाडी खरेदी केली आणि वाहन व्यवसायात पाऊल ठेवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या हिमतीवर उभ्या राहिलेल्या या ‘नवदुर्गे’चा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

दागिने गहाण ठेवून खरेदी केली अर्बानिया
याच काळात मीना लांडगे यांच्या नजरेस अर्बानिया गाडी पडली. ती आवडल्याने त्यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक होती. मात्र, आर्थिक अडचणीमुळे त्यांनी माघार घेतली नाही. स्वतःचे मंगळसूत्र, झुमके आणि अन्य दागिने गहाण ठेवून त्यांनी अर्बानिया गाडी खरेदी करत व्यवसायाला सुरुवात केली.

बालपणापासूनच वाहनांची ओढ
मीना लांडगे यांना लहानपणापासूनच वाहन चालविण्याची आवड होती. दुचाकी चालविण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास चारचाकी, ट्रॅक्टर आणि टेम्पोपर्यंत पोहोचला. त्यांच्या या आवडीला वडिलांनी प्रोत्साहन दिले. मात्र, 1999 मध्ये वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही त्यांनी वाहन चालविण्याची आवड सोडली नाही. पुढे मामाने त्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले. ‘माझे बैल सांभाळ, मी तुला गाडी चालवायला शिकवतो,’ अशी मामाने घातलेली अट त्यांनी स्वीकारली. मामाकडून एकामागून एक वाहने चालविण्याचे धडे घेत त्यांनी आपले कौशल्य विकसित केले.

पतीच्या पाठिंब्याने बनल्या बसचालक
लग्नानंतर पतीनेही त्यांच्या आवडीला आणि स्वप्नांना पाठिंबा दिला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मीना यांनी बसचालक होण्याचे ध्येय निश्चित केले. मुंबईत बसचालक म्हणून काम सुरू केले. मात्र, तेथील वातावरणात मन न रमल्याने त्या नाशिकला परतल्या. येथे एका कंपनीत त्यांनी तीन वर्षे बसचालक म्हणून काम केले. या काळात कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर तीन वर्षांनंतर त्यांची नोकरी गेली. मात्र, या अपयशाने त्या खचल्या नाहीत. त्यांनी एका वाहनचालक प्रशिक्षण संस्थेत दोन महिने नोकरी केली.

सतरा राज्यांचा प्रवास; 25 हजार किलोमीटरचा टप्पा
मीना लांडगे यांच्या अर्बानिया गाडीने आज देशातील 17 राज्यांचा प्रवास केला आहे. 25 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यापासून ते स्वतःचा व्यवसाय उभारण्यापर्यंतचा मीना यांचा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. महिलांनी केवळ अडचणींचा विचार न करता आपल्या कौशल्यावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जावे, असा संदेश त्यांच्या प्रवासातून मिळतो.

Meena Landge’s soaring success driven by sheer determination.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

3 minutes ago

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

22 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago