दि. 13 एप्रिल 2022.
अमृतसरमधील जालियनवाला बागमधील रक्तरंजित हत्याकांडाला 103 वर्षे पूर्ण झाली. आजच्या दिवशी 102 वर्षांपूर्वी जनरल डायरने वीस हजार
माणसांच्या सभेवर बेछूट गोळीबार केला होता. ती वेळ होती सायंकाळची… 4 वाजून 30
मिनिटे…जालियनवालाबाग म्हणजे तीन बाजूंनी बंदिस्त असलेली एक बखळच होती. या बखळीत जाण्यासाठी एकच अरूंद वाट होती. ब्रिटिश जनरल डायरने एकूण सोळाशेहून अधिक फैरी झाडल्या. याफैरीत अनेक मुले, वृद्ध व नागरिक मृत्युमुखी पडले. अरूंद वाट असल्याने डायरला तोङ्गा नेता आल्या नाहीत. या गोळीबाराने हाहाकार उडाला. नंतर ब्रिटिश सरकारने सुमारे 379 माणसे मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले. पण अनधिकृत अंदाज सुमारे हजारापेक्षाही जास्त होता.
देशभर या हत्याकांडानंतर देशप्रेमाची भावना अधिकच जागृत झाली. जनरल डायरच्या शोधात काही देशप्रेमी युवक होते. त्यातील उधमसिंग नावाच्या तरुणाने जो जालियनवाला बाग हत्याकांडात जखमी झाला होता, त्याने 13 मार्च 1940 साली पंजाबचा गव्हर्नर असलेल्या मायकेल आडेवायरला ठार मारले. 31 जुलै 1940 रोजी तो ङ्गाशीला सामोरा गेला. या जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची ही रेरंजित कहाणी. जालियनवाला बाग हे पंजाबमधील अमृतसरमधील एक ठिकाण. ब्रिटिश सरकारने 1918 साली मांटे 12 यूचेम्सङ्गर्ड सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणा जाहीर होताच देशभर याचा विरोध झाला. यानंतर रौलेट कायदाही अमलात आणला गेला. त्या कायद्याबाबत रहिवाशांना पूर्ण माहितीही नव्हती.
जालियनवाला बागेतील स्मारक
यानंतर श्रीनिवास शास्त्री व महात्मा गांधी यांनी या कायद्याबाबत कठोर टीका केली. यानंतर देशभर आंदोलनाचा भडका उडाला. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांना पंजाबात येण्यास ब्रिटिश सरकारने बंदी घातली. या बंदीमुळे आगीत तेल ओतल्याची परिस्थिती निर्माण झाली. अमृतसर येथे 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्यात आला. सरकारने पंजाबमधील नेते किचलू व सत्यपाल यांच्यावर भाषणबंदीचा आदेश बजावला. शेवटी शेवटी याचा कहर म्हणजे 11 एप्रिल 1919 रोजी संपूर्ण अमृतसर शहर लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. पण या आदेशाला या दोन्ही नेत्यांनी जुमानले नाही. नेमका हा दिवस प्रतिपदेचा होता. तसेच रविवार होता अन् याच दिवशी शीखांचा बैशाखी सण होता. जालियनवाला बाग हे मैदान सुमारे 6 ते 7 एकर एवढे होते. लष्करी सत्तेला न जुमानता लाला हंसराज व किचलू यांनी जालियनवाला बाग येथे 13 एप्रिलला जाहीर सभा होईल, असे जाहीर केले. या दिवशी कोणत्याही बैठका किंवा मिटिंग 12 घडविण्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. विशेष म्हणजे नोटीस मात्र सर्व ठिकाणी नव्हती. जालियनवाला बाग येथे सभा सुरू झाली अन् सायंकाळी 4.30 मिनिटांनी जमावावर अमानुष गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात अनेक मुले, वृद्ध सापडले. पहिल्या दहा मिनिटांतच सुमारे 1650 हून अधिक ङ्गैरी झाडण्यात आल्या. (जालियनवाला बाग येथील गोळीबाराच्या खुणा) अनेकांनी जालियनवाला बाग येथील विहिरीत जीव वाचविण्यासाठी उड्या ठोकल्या. त्यातही अनेक जण मृत्युमुखी पडले.सुमारे 120 मृतदेह त्यातून बाहेर काढण्यात आले. गोळीबारात मृत्यू पावलेल्यांचा अधिकृत मृत्यूचा आकडा ब्रिटिशांनी 379 एवढा जाहीर करण्यात आला. पण अनधिकृत अंदाजानुसार 1500 पेक्षाही जास्त माणसे मृत्युमुखी पडली होती. आजही जालियनवाला बागेत असलेल्या स्मृतिङ्गलकावर दोन हजार लोकांचा बळी गेलेल्यांची नोंद आहे. जखमींची संख्याही काही हजारांत होती. यावरही कळस म्हणजे ब्रिटिश सरकारने अमृतसरचा वीज व पाणी पुरवठा काही दिवस बंद ठेवला. यानंतर देशांत राष्ट्रीय भावना उङ्गाळली. या हत्याकांडाचे पडसाद ब्रिटिश संसदेतही उमटले. ब्रिटिश संसदेने 247 विरुद्ध 537 अशा मताधिक्याने डायरच्या विरोधात मतदान केले. विस्टर्न चर्चिल यांनी जालियनवाला बाग ही घटना इतिहासातील काळीकुट्ट घटना असल्याचा उल्लेख केला. या हत्याकांडानंतर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश पदव्यांचा त्याग केला. या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात 1920 ते 22 मध्ये घडलेल्या असहकार चळवळीची बीजे रोवली गेली.
कोकणच्या हापूस आंब्याची अमेरिका वारी
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर 1020 साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने एक ठराव पास करून स्मारक बनविण्याचे ठरविले. त्या स्मारकासाठी 1923 साली एका ट्रस्टची स्थापना केली गेली. बेंजामिन पोल्क या अमेरिकन व्यक्तीकडे स्मारकाचे डिझाईन करण्याचे काम होते. स्मारक पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 13 एप्रिल 1961 या दिवशी झाले. आजही या ठिकाणी स्मारकाच्या भिंतीवर गोळीबाराच्या खुणा आहेत. तसेच ज्या विहिरीत लोकांनी उड्या मारल्या ती विहीरही संरक्षित स्मारक म्हणून आहे. 14 ऑक्टोबर 1997 रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राजपुत्र फिलिप यांच्यासह या बागेत येऊन शहिदांप्रति संवेदना प्रकट केली व अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांची अमानुष गोळीबाराची चूक कबूल केली. एकूणच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जालियनवाला बाग हत्याकांड हा एक रेरंजित इतिहास आहे. आज बरोबर 102 वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रवादाने वळण घेतले व राष्ट्रीय भावना अधिकच उङ्गाळली व स्वातंत्र्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. या हत्याकांडाच्या शताब्दीनिमित्त त्या हत्याकांडात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण
श्रद्धांजली!
– शांताराम वाघ -पुणे
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…