नाशिक

मंत्री गडकरींकडून द्वारका रस्ते प्रकल्प मंजूर

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थापूर्वी द्वारका-नाशिकरोड महामार्ग रस्त्याच्या 221.51 कोटींच्या निधीसह कामाची घोषणा खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मंगळवारी (दि.26) मंत्री गडकरी यांनी त्यांच्या सोशल माध्यमाद्वारे याबाबतची पोस्ट टाकत माहिती दिली.
मागील महिन्यात महापौर हिमगौरी आहेर-आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेत द्वारका ते दत्त मंदिर चौक या रस्त्याच्या कामाला व निधीला मंजुरी देण्याचे साकडे घातले होते. त्यानंतर खर्‍या अर्थाने या रस्त्याच्या कामाला चालना मिळाली होती. राष्ट्रीय महामार्ग 60 वरील द्वारका ते नाशिकरोड या सुमारे साडेसहा किमीच्या रस्त्यावरून प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच सिंहस्थाच्या अनुषंगाने तर या रस्त्यावरून अनेक पटीने वाहतूक होणार असल्याने रस्ता रुंदीकरणाचा निर्णय महापालिका तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. त्यानुसार आता या रस्त्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून हाती घेतले जाणार असून, आता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आपल्या सोशल माध्यमातून त्याबाबतची घोषणा केल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. सिंहस्थ कामांनादेखील विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेतून वगळण्यात आल्याने या रस्त्याच्या कामाचाही मार्ग खुला झाला आहे.
महापालिकेने द्वारका ते दत्त मंदिर चौक या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया हाती घेतली असून, गेल्या आठवड्यात त्याबाबत संबंधित सहभागी होणार्‍या ठेकेदारांची निविदापूर्व बैठक पार पडली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी दिल्ली दौर्‍यात या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत निधी मंजुरीची भेट नाशिककरांना दिली होती. त्यानंतर आता स्वत: मंत्री गडकरी यांनी याबाबतची माहिती त्यांच्या सोशल माध्यमाद्वारे दिली आहे.

Minister Gadkari approves Dwarka road project

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago