चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती
नाशिक : प्रतिनिधी
भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी नेहमीच ओळखले जातात. कधी बिबट्याला पकडण्यासाठी तर कधी थेट हायवा चालविण्यापर्यंत त्यांनी दाखविलेले साहस सर्वांनीच पाहिले आहे. काल त्र्यंबक दौर्यात मंत्री गिरीश महाजन हे पोलिसांसाठी संकटमोचक ठरले. चिखलात रुतलेले वाहन काढण्यासाठी त्यांनी स्वत:च स्टेअरिंग हाती घेत वाहन सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढले.
राज्यात पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक संकटे उद्भवल्यानंतर घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणार्या मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन यांचे नाव नेहमीच घेतले जाते. आपत्तीग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे, प्रशासनाशी समन्वय साधणे, नागरिकांना धीर देणे आणि आवश्यक निर्णय तातडीने घेण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांची कार्यशैली अनेकदा अनुभवायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात अनेकजण त्यांच्याकडे ‘संकटमोचक’ म्हणूनही पाहतात.
त्र्यंबकेश्वरमधील ही घटना पाहता, चिखलात अडकलेले वाहन बाहेर काढणे ही कदाचित एक छोटी बाब वाटू शकते. मात्र, राज्याचा एक मंत्री कोणताही पदाचा मोठेपणा न दाखवता स्वतः पुढे येतो, वाहनाचे स्टेअरिंग हातात घेतो आणि प्रत्यक्ष कृतीतून अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो, हा संदेश उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या मनाला स्पर्श करून गेला. संकटाच्या काळात पदाचा आव न आणता लोकांमध्ये मिसळून काम करण्याची वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती प्रत्यक्ष हाताळण्याची तयारी हीच त्यांच्या कार्यशैलीची ओळख बनली आहे.
Minister Mahajan proves to be a ‘troubleshooter’ for the police.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…