नाशिक

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी

सिडको : प्रतिनिधी
रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, उंटवाडी येथील दोंदे पुलालगत वाहणारी नंदिनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
कोठावळे मळा, पांगरे मळा आणि बडदेनगर परिसरातील नालेही तुडुंब भरल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलजवळील दोंदे पुलालगत वाहणारी नंदिनी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे कोठावळे मळा, पांगरे मळा आणि बडदेनगर परिसरातील अंतर्गत नालेही तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Nandini river floods due to continuous rains

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago